आईच्या अंत्यसंस्कारानंतर दिले कॅन्सरग्रस्तास जीवदान दीपक कांबळेंच्या मानवतेला सलाम

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आईच्या अंत्यसंस्कारानंतर दिले कॅन्सरग्रस्तास जीवदान दीपक कांबळेंच्या मानवतेला सलाम


औरंगाबाद: स्वतः ची आई कायमची सोडून गेल्याचे दु:ख ताजे असतानाच रक्तदान करून एका कॅन्सर ग्रस्त रुग्णाचे प्राण वाचवून आपल्या आईस  खरी श्रद्धांजली दिल्याची मानवतावादी घटना आज औरंगाबाद येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल नगर, परभणी येथील रहिवासी अशोक कांबळे ( सेवानिवृत्त, रेल्वे कर्मचारी) यांची पत्नी शिला कांबळे यांचे आज दि. 16 मे रोजी पहाटे 4.30 वा औरंगाबाद येथील घाटीत  निधन झाले. शिला कांबळे यांचे पती व मुले दिपक कांबळे, विनोद कांबळे आदींनी सकाळी 9 वा बेगमपुरा येथील  स्मशानभूमीत अंत्यसंकार केले. त्यानंतर उपस्थित सर्व नातेवाईक व भावांना परभणीला पाठवून दिपक कांबळे राख सावडण्याच्या विधीसाठी थांबुन दुपारी दीपक कांबळे यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांचे मित्र राजकुमार कांबळे आले होते. ते महामाया आधार फाउंडेशन संस्थेच्या मार्फत सरकारी व खाजगी रक्तपेढीला रक्त पुरवण्याचे काम करतात. याचवेळी त्यांना  कॅन्सर पेशंटला अत्यावश्यक O+ve रक्त हवे असल्याचा फोन आला. त्यांनी काही नियमित रक्तदात्यांना संपर्क केला, परंतु वेळेवर कोणी उपलब्ध नसल्याने त्यांची ही धडपड दीपक कांबळे यांना  पहावली  नाही.  दिपक म्हणाला, माझे ब्लड ग्रुप O+ve आहे,मी रक्तदान करतो. त्यावर मित्राने तयारी दर्शवली नाही. कारण काही तासांपूर्वीच दीपकने आईला निरोप दिला होता. पण,आईला तर आपण वाचवू शकलो नाही. असाच एक जीव  मृत्यूशी लढत आहे. अश्यावेळी त्याला मदत केली तर हीच आईला खरी श्रद्धांजली ठरेल या विचाराने रक्तदान करून दीपकने वाणी परिवारातील कोणताही संबंध, ओळख नसलेल्या १६ वर्षाच्या मुलाला जीवदान दिले. आज दीपकसारख्यांची समाजाला गरज वाणी परिवारातील अवघ्या 16 वर्षेच्या माझ्या भावाला ब्लड कँसर आहे. त्याला गेल्या दोन दिवसात दोन बॅग चढवल्या परंतु प्रकृती चिंताजनक होती. उद्या रक्त चढवणे आवश्यक होते. दीपक सरांच्या घरी आजच दुःखद घटना घडली तरी त्यांनी आम्हाला मदत केली. आम्ही त्यांचे कायम कृतज्ञ राहू.  त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. ज्यांचा जीवनाशी संघर्ष चालू आहे, अश्याना दीपक सरांसारख्या माणसांची समाजाला गरज आहे.शुद्ध व प्रामाणिक भावनेतून दीपक यांनी घाटी येथे रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचवले. रक्तदान करत असताना  बाहेर जोरदार पाऊस झाला. हा योगायोग असला तरी जणू मुलाने आईला दिलेल्या श्रध्दांजलीस, आईने अनुमोदन दिले. अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या