महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त उद्या आंबेडकरी कलावंतांचा लाईव्ह जलसा...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त उद्या आंबेडकरी कलावंतांचा लाईव्ह जलसा...

महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, बाळापुर जि. अकोलाचा उपक्रम

अकोला/प्रतिनिधी:- महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, बाळापुर जि. अकोलाच्या वतीने उद्या 30 आॅगस्ट 2020 रोजी दुपारी 3 वाजता ‘‘वामनदादा कर्डक जयंती महोत्सव 2020 वर्ष सातवे हा आंबेडकरी कलावंतांचा लाईव्ह जलसा ‘मराठी साहित्य वार्ता’ फेसबुक पेजवर होणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक अरविंद सिरसाट, प्रसिद्ध ढोलगीपटू प्रमोद उमाळे, प्रसिद्ध संगीतकार सतिश दामोदर, प्रसिद्ध तबलापटू तिलक चावरीया, राजेश इंगळे, जयदीप वानखडे, दिनेश गवई, सुनील नाईक, दीपक शाह, धीरज आंग्रे आदी कलावंत सहभागी होणार आहेत. 

           


        गेल्या सहा वर्षा पासून बाळापुर शहरात वामनदादा कर्डक जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदा कोरोनामुळे हा कार्यक्रम मराठी साहित्य वार्ता फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी निर्मिती साहाय्य म्हणून बी. आर. प्रस्तुत म्यूझिकल ग्रुप, महाराष्ट्र राज्य, जय हो आर्केष्ट्रा, अकोला आणि स्वरांजली म्यूझिकल ग्रुप बाळापुर आदी संस्थांचा सहभाग असणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाहण्याचे आवाहन महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, बाळापुर जि. अकोलाचे अध्यक्ष अमरदीप वानखडे, सचिव अमोल सिरसाट, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. विशाल उमाळे, पत्रकार उत्तमराव दाभाडे, राजेश अवचार, रवी थेटे, सुशिल वाकोडे आदींनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या