सदा डुंबरे पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सदा डुंबरे पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर



Social24Network

पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक सदा डुंबरे यांचे व्यक्तीमत्व कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. आज ज्येष्ठ पत्रकार तथा 'सकाळ' साप्ताहिकाचे माजी संपादक सदा डुंबरे यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना अ‍ॅड. आंबेडकरांनी आदरांजली व्यक्त केली आहे.


अ‍ॅड. आंबेडकरांनी ट्वीटमध्ये पुण्यातील ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाच्या कार्यालय उद्घाटनाची आठवण सांगतांना लिहिले आहे की, ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकाच्या पुणे येथील कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला सदा डुंबरे यांना निमत्रित करण्यात आले होते. ते समांतर माध्यमांसाठी आग्रही होते. ‘प्रबुद्ध भारत’ सारख्या स्पष्ट राजकीय भूमिका मांडणा-या पाक्षिकाची आज गरज आहे. असे त्यांचे मत होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘प्रबुद्ध भारत’ नव्या जोमाने सुरू रहावा अशी कामना त्यांनी व्यक्त केली होती. सध्याच्या काळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘प्रबुद्ध भारत’ नव्या जोमाने सुरू रहावा अशी भूमिका त्यांनी मांडली होती.


सदा डुंबरे हे साप्ताहिक 'सकाळ'चे गेली 21 वर्ष संपादक होते. सकाळ समूहामध्ये बातमीदार ते संपादक असा मोठा पल्ला गाठलेल्या सदा डुंबरे यांची 'आरसपानी', 'प्रतिबिंब', 'दशकवेध', 'कर के देखो' आणि 'देणारं झाड' आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या दहा-बारा दिवसांपासुन त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. दरम्यान आज त्यांचे दुःखद निधन झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या