बिनडोक म्हणजे शिवी नाही ; बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घ्या... - प्राचार्य म.ना. कांबळे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बिनडोक म्हणजे शिवी नाही ; बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घ्या... - प्राचार्य म.ना. कांबळे

 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत जी भूमिका मांडली ती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. काही लोक बाळासाहेब आंबेडकरांनी खा. उदयनराजे भोसले यांना बिनडोक राजे म्हणाल्यामुळे पराचा कावळा करीत आहे करीत आहे. त्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. म्हणून मी काही मुद्दे येथे मांडत आहे.

       काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...

या कारणामुळे बाळासाहेब उदयनराजेंना ‘‘बिनडोक’’ म्हणाले...

प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत ; खा. संभाजी राजे

मुद्दा क्रमांक १ - माझ्या मते बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्य कथन केले आहे केले आहे. खासदार उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी भारतीय संविधानाची शपथ घेऊन खासदारपद स्वीकारले आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय संविधानाच्या विरोधात बोलत असताना बोलत असताना विचारपूर्वक बोलणे आवश्यक होते. परंतु ते काही विचार न करता संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीबाबत विरोधात बोलले. ती त्यांची घोडचूक होती. 

मुद्दा क्रमांक २ - खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेले विधान असे होते की, जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा. याचा अर्थ असा की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एस. सी., एस. टी., ओ. बी. सी. यांना दिलेले आरक्षण रद्द करा. त्यांच्या विधानांने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा व भारतीय संविधानाचा अपमान त्यांनी केलेला आहे. त्यांनी विवेक बुद्धीचा वापर केलेला दिसत नाही. म्हणूनच त्यांच्याकडून एवढी मोठी घोडचूक झाली. 

मुद्दा क्रमांक ३ - तरीही आरक्षणाचा लाभार्थी समाज शांत राहिला. दुसरे कोणी असे विधान केले असते तर निषेध मोर्चे निश्चितच निघाले असते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना, राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे लाभार्थी व समाज  हृदयातून मानतात. त्यामुळे त्यांनी संयम पाळला.

मुद्दा क्रमांक ४ - परंतु उदयनराजे भोसले यांच्या विधानांनी मराठा समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मराठा आरक्षण  आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची संभाव्यता निर्माण झाली होती. म्हणून सामाजिक शांतता व सलोख्याची सतत चिंता करणारे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले. उदयनराजे भोसले यांची घोडचूक दाखवून दिली. ते बरोबरच आहे व आवश्यक ही होते.

मुद्दा क्रमांक ५ - बिनडोक म्हणजे काय?  मी गुगल सर्च करून बिनडोक शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे. बिनडोक म्हणजे शिवी नाही. बिनडोक म्हणजे अपमान नाही. बिनडोक म्हणजे घोडचूक करणारी व्यक्ती. जेव्हा एखादी व्यक्ती बुद्धीचा किंवा डोक्याचा वापर न करता एखादी कृती करते तेव्हा त्या व्यक्तीने केलेली कृतीअसते त्याला बिनडोक म्हणतात. दुसऱ्या शब्दात बिनडोक म्हणजे सारासार विचार न करता एखाद्या घटनेबाबत व्यक्त होणे होय. हेच नेमके उदयनराजे भोसले यांनी केलेले आहे. म्हणून त्यांनी केलेली कृती बिनडोकपणाची आहे हे उघड आहे. त्या विधानाचे गांभिर्य व संभाव्य परिणाम त्यांनी विचारात घेतले नाही. म्हणून जाणीव करून दिली. घोडचूक दाखवून देणे म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नाही तर ती उदयनराजे भोसले यांची चूक आहे एवढेच.

मुद्दा क्रमांक ६ - बाळासाहेब आंबेडकरांशिवाय हे काम करण्याची हिम्मत दुसऱ्यात नव्हती. समाजस्वास्थ्यासाठी हे विधान बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ते आवश्यक होते. आंबेडकर घराण्याचे वंशज म्हणून हे त्यांचे कामच होते.

मुद्दा क्रमांक ७ - बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षणवादी आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी दिनांक दहा रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण  बंद आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिलेला आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षण ही न्यायालयीन लढाई झाली आहे. आपण न्यायालयात जिंकू शकतो. त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी अत्यंत संयमाने वागले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली होती.

मुद्दा क्रमांक ८ - मराठा आरक्षण आंदोलन निमित्ताने कोणत्याही परिस्थितीत समाजातील शांततेचा भंग होऊ नये. अशी भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासूनच घेतलेली होती. हे विसरता कामा नये. 

मुद्दा क्रमांक ९ - दुसरे असे की मराठा आरक्षणाचा विषय हा आता केंद्र सरकारच्या कक्षेत गेलेला आहे. कारण १०२ वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने २०१८ मध्ये केलेली आहे. कोणत्याही जातीला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारकडून  १०२ घटनादुरुस्तीने काढून घेतलेला आहे. कारण आर एस एस आणि बीजेपी आरक्षण विरोधी आहे. 

मुद्दा क्रमांक १० - मराठा आरक्षणासाठी बीजेपीच्या केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे हे उघड आहे. म्हणून मला असे वाटते की तथा बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. ते मराठा आरक्षणाचे व त्यासाठी होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे समर्थक आहेत. मराठा आरक्षण समर्थकांनी त्यांना सोबत घेऊन आंदोलन करावे. त्याचा निश्चितच फायदा होईल. विनाकारण मुद्दा भावनिक करून समाजात तेढ निर्माण करू नये. असे आवाहन मी फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलनाच्या सर्व नेत्यांना करीत आहे.

जय शिवराया जय भीम!

प्राचार्य म. ना. कांबळे

अध्यक्ष, फुले-आंबेडकर विद्वत सभा 

महाराष्ट्र राज्य

       काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...

या कारणामुळे बाळासाहेब उदयनराजेंना ‘‘बिनडोक’’ म्हणाले...

प्रकाश आंबेडकर चुकीचे बोलले नाहीत ; खा. संभाजी राजे

हा तर संघ-भाजपाचा कट - श्रीमंत कोकाटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या