लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्यात औरंगाबाद 19 लोकसभा मतदार संघामध्ये मतदारांनी फोडा-फोडी आणि जाती-पातीच्या राजकारणाला तिरांजली देत वंचित बहुजन आघाडीला पसंती दिली असल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पहायला मिळाले आहे.औरंगाबाद/प्रतिनिधी - शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या फोडा-फोडीच्या राजकारणाला, भाजपाच्या खुनसी राजकारणाला आणि कॉंग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळून औरंगाबादकरांनी वंचित बहुजन आघाडीला पहिली पसंतील दिली असल्याचे सकाळी 11 वाजेपर्यंत हाती आलेल्या रिपोर्टनुसार समजते.
तर दुसरीकडे एमआयएम पक्षाने वंचितच्या उमेदवाराविरूद्ध खोटी बातमी प्रसारित केल्याने मुस्लिम समाजामध्ये कालपर्यंत चर्चेला उधान आले होते. परंतु वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी एमआयएम पक्ष आणि खोटी बातमी प्रसारित करणा-यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. तर अपक्ष उमेदवार डॉ. जिवन राजपूत आणि हर्षवर्धन जाधव यांनाही अनेक मतदान केंद्रामध्ये आघाडीची मते मिळाली असल्याचे दिसते.
एकुण परिस्थितीनुसार औरंगाबाद लोकसभेची खरी लढत महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे आणि वंचितचे अफसर खान या दोघांमध्येच असल्याची चर्चा अनेक मतदान केंद्रावर ऐकायला मिळाली आहे.
0 टिप्पण्या