Social24Network
आणखी किती दिवस मुख्यमंत्री व्हिडिओ काॅन्फरसिंग करणार? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आजपासून (दि. १८ आँक्टोबर) राज्यभरात दौरा करणार असल्याचे जाहिर केले आहे. व्हिडिओ काॅन्फरसिंगपेक्षा लोकांमध्ये जावून त्यांना सात्वन द्या, काय मदत करणार असाल ती जाहिर करा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना केली होती. अँड. आंबेडकर यांनी केलेल्या ट्वीट नंतर मुख्यमंत्र्यांनी अवघ्या २४ तासातच हा दौरा नियोजित केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पुरग्रस्त भागातील अधिका-यांची व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे संवाद साधला होता. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे खळबळून जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आजपासून (दि. १८ आँक्टोबर) सोलापूर जिल्ह्याच्या पाहणीचे नियोजन आखले आहे.
काय म्हणाले अँड. प्रकाश आंबेडकर वाचा सविस्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करून पूरसदृश्य स्थितीचा आढावा घेतला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर संतप्त झाले असून मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ काॅन्फरसिंगच्या बाहेर पडून पुरग्रस्त भागाचा दौरा करावा, लोकांमध्ये जावून त्यांचे सात्वन करावे अशी सूचना अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे. वस्त्यांमध्ये पाणी गेलेलं आहे. अन्यधान्य सगळं भीजलेलं आहे. शेतक-याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, त्यांनी महाराष्ट्रातल्या काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल. आणि त्याचसोबत आपत्ती व्यवस्थापनाबरोबर बैठक घेवून लोकांना रिलीफ काय काय देणार आहात त्याची ताबडतोब घोषणा करावी.
आणखी संबंधित बातम्या...
समरसतेवरून आंबेडकरांचा आरएसएसवर निशाणा ; म्हणाले समरसता म्हणजे ‘‘मेरा पेट भरता...
राज्यपालांच्या ‘‘त्या’’ भूमिकेला अँड. प्रकाश आंबेडकरांचे समर्थन ; मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ
अँड. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या भाकीताला सुरूवात? ; राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात संघर्षाला...
सरकार एक जातीय दबावाखाली - अँड. प्रकाश आंबेडकरांची ठाकरे सरकारवर घाणाघाती टीका
तंगळ्यात तंगळ घालण्याचा प्रयत्न करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


0 टिप्पण्या