राज्यपालांच्या ‘‘त्या’’ भूमिकेला अँड. प्रकाश आंबेडकरांचे समर्थन ; मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राज्यपालांच्या ‘‘त्या’’ भूमिकेला अँड. प्रकाश आंबेडकरांचे समर्थन ; मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ


Social24Network

कालपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रव्यवहाराची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पत्रव्यवहारामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री ही दोन्ही पदे संविधानिक असून त्यांचा आदब राखला पाहिजे. कोणीतरी जाणिवपूर्वक वारकरी आणि मुख्यमंत्री असा वाद लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप यावेळी अँड. प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

काय म्हणाले अँड. प्रकाश आंबेडकर वाचा सविस्तर

राज्यपाल आणि मुख्यमंत्री ही दोन्ही पदे संवैधानिक आहेत. त्यांचा आदब राखला पाहिजे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रातील भाषेवरून हा आदब राखलेला दिसत नाहीये. राज्यपालांच्या पत्रातील मंदिरे उघडा याचच फक्त आम्ही समर्थन करतोय. कारण, केंद्र सरकारने मंदिर उघडा अशी भूमिका घेतलेली आहे. घटनेमध्ये केंद्र सरकारने घेतलेला निर्णय राज्य शासनाला बंधनकारक असतो. आणि म्हणून घटना ही श्रेष्ठ आहे, व्यक्ती नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या