Social24Network
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करून पूरसदृश्य स्थितीचा आढावा घेतला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर संतप्त झाले असून मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ काॅन्फरसिंगच्या बाहेर पडून पुरग्रस्त भागाचा दौरा करावा, लोकांमध्ये जावून त्यांचे सात्वन करावे अशी सूचना अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे. वस्त्यांमध्ये पाणी गेलेलं आहे. अन्यधान्य सगळं भीजलेलं आहे. शेतक-याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की, त्यांनी महाराष्ट्रातल्या काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल. आणि त्याचसोबत आपत्ती व्यवस्थापनाबरोबर बैठक घेवून लोकांना रिलीफ काय काय देणार आहात त्याची ताबडतोब घोषणा करावी.


0 टिप्पण्या