राहुल-प्रियंकाच्या बाबतीत पोलीसांच्या वागण्यामध्ये नाविन्य वाटत नाही - अँड. प्रकाश आंबेडकर
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेल्या घटनेमध्ये पिडित कुटुंबाला भेटण्यासाठी काॅंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गेले असता त्यांच्यावर पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये काहीही नाविन्य नसल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. काॅग्रेस सरकारमध्ये सुद्धा पोलीसांनी आंदोलकांना अशाच प्रकारची वागणूक दिली असल्याची टीका यावेळी अँड. आंबेडकरांनी केली आहे.
दरम्यान आज (दि. ५ आँक्टोंबर) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हाथरस येथे झालेल्या अत्याचारासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अँड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अँड. आंबेडकर म्हणाले की, कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे. हा मुद्या नाही. परंतु आम्ही जेव्हा आंदोलनं केली तेव्हा काॅंग्रेस सरकरमध्ये पोलीसांनी आमच्यावरही अशाच प्रकारची कारवाई केली आहे. त्यामुळे इतर आंदोलनामध्ये पोलीस जसे वागतात तसेच या आंदोलनामध्ये वागले आहेत. त्यामुळे त्यामध्ये नवीन काही वाटत नाही. जेव्हा आमच्यावर अशा प्रकारची कारवाई झाली तेव्हा हा ‘‘इश्यू’’ झाला नसल्याची टीकाही अँड. आंबेडकरांनी यावेळी केली आहे.
बीजेपी, आरएसएस ने जे पेरले तेच उगवत आहे
जातीचं आणि धर्माचं राजकारण चालले पाहिजे असा जो प्रचार आरएसएस, बीजेपीने केला आहे. तो आता खुलेआम दिसायला लागला आहे. त्यामुळे या घटनेला जातीय रंग दिल्या जात असल्याबाबत सरकारने कोणालाही दोष देवू नये. कारण जे आपण पेरलं आहे तेचं आता उगवत चाललं आहे. आणि हे या निमित्ताने आपल्याला दिसायला लागलं आहे. नुसता अत्याचार झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो परंतु अत्याचाराबरोबर क्रुरता वाढत चालली आहे. या व्यवस्थेमध्ये ही क्रुरता आली कुठुन? असा सवाल यावेळी अँड. आंबेडकर यांनी केला आहे.
पिडित कुटुंबाच्या भेटीसाठी अँड. आंबेडकर हाथरसला
सरकार आणि पोलीसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशनाखाली आणि नियंत्रणाखाली या प्रकरणाची चैकशी व्हावी या पिडित कुटुंबाने केलेल्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अँड. आंबेडकरांनी यावेळी जाहिर केले. या प्रकरणामुळे लोकांच्या संवेदना जाग्या झाल्या असून लोक रस्त्यावर उतरले आहेत, सर्वसामान्य जनता या चूकीच्या कृत्याबद्दल संतप्त झाली आहे. मनीषा न्याय मिळाला पाहिजे यासाठी सवर्ण सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे असेही अँड. आंबेडकर यावेळी म्हणाले.


0 टिप्पण्या