Social24Network

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी मातीचा गंध जागतिक पातळीवर पोहोचतो आहे... - कल्याणी राजगे-शिंदे, नायझेरिया 

मराठी साहित्य वार्ता युट्युब चॅनलचे आंतरराष्ट्रीय पातळीहून कौतुक

कल्याणी राजगे-शिंदे, नायझेरिया

पुणे/प्रतिनिधी - मराठी माणसांशी, मातीशी जुळवून ठेवण्याचे काम मराठी साहित्य वार्ता करीत आहे. आज आम्ही परदेशातुन आपल्या देशातील लोकांशी थेट संवाद साधू शकतो. त्यांच्या मिळणा-या प्रतिक्रियेतून या आम्हाला मायभूमिच्या मातीचा गंध मिळतो. मराठी भाषेला आणि मराठी साहित्याला या डिजिटल युगात एकसंघ ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य मराठी साहित्य वार्ता करीत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री कल्याणी राजगे-शिंदे, नायझेरिया यांनी केले. 

       त्या मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ता युट्युब चॅनल आयोजित ‘कविता आणि इतर गप्पा’ या सदरातुन बोलत होत्या. यावेळी कल्याणी यांनी आपल्या काही कविता सादर केल्या त्यामध्ये उंबरठा नावाच्या कवितेला काव्यरसिकांची मोठी दादा मिळाली.


उंबरठा तीने तेव्हाचं ओलांडला होता

जेव्हा तीच्या येण्याअगोदर त्याच्या येण्याचे वाट

तीचच लोक पाहत होते.... 

जेव्हा आजीने नाराजीच्या स्वरात मुलगी झाल्याचा शोक

गावभर मनवला...

जेव्हा आजोबाच्या चेह-याचा रंग उतरला होता

जेेव्हा बाबांनी मुलगी म्हणता बरोबर पाहायला नकार दिला होता...

उंबरठा तीने तेव्हाचं ओलांडला होता. 


यानंतर माहेर ही कविता यावेळी त्यांनी सादर केली. 

कल्याणी राजगे-शिंदे, नायझेरिया


सखे माहेरच्या अंगणी

परसात होता बाबा

डोळा तरंगते पाणी... लेकीस पाहतांना...

देतो आईला आवाज

पहा गं लक्ष्मी ही माझी आली

आण भाकर तुकडा

ओवाळून टाकू हिच्यावरूनी

दारामागून आई... ऐकते, धावते...

लेकी बिलगण्या जीवाचा आटापिटा ती करीते....

अशा अनेक विषयांवर वास्तववादी कविता यावेळी कल्याणी त्यांनी सादर केल्या.

मराठी साहित्य वार्ता या युट्युब चॅनलला झालेला लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.

लाईव्ह कार्यक्रम येथे पहा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या