पुरोगामी सरकारची प्रतिगामीत्वाकडे वाटचाल ; अँड. प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर घाणाघाती टीका

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पुरोगामी सरकारची प्रतिगामीत्वाकडे वाटचाल ; अँड. प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर घाणाघाती टीका

Social24Network

महाराष्ट्र सरकार पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून आहे, पुरोगामीत्वाचा वापर करून सत्तेत आलेलं हे सरकार प्रतिगामीत्वाकडे झुकत चालले असल्याची घणाघाती टीका  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.  प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  


काय म्हणाले अँड. प्रकाश आंबेडकर वाचा सविस्तर...


महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन परंतु हळूहळू हे शासन प्रतिगामी होत चालले आहे. कोरोना नंतर केंद्र शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाने ते मान्य केले नाहीत. आरोग्य सेतू हा अँप आला त्याच्यातून लोकांची तब्येत कशी आहे ते कळते, कोरोना बाधित आहे की नाही हे कळते परंतु महाराष्ट्र शासनाने अजूनही लॉक डाऊन उठवला नाही अशी परिस्थिती आहे. इतर राज्यांमध्ये सुद्धा मी फिरतोय त्यांनी मंदिर उघडी केली आहेत तिथला व्यवसाय आणि भक्तांची दोघांचीही बाजू साधली आहे परंतु अजूनही महाराष्ट्र शासन मंदिर खोलायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूस आर्थिक व्यवस्था इतर राज्यांनी सुरू केलेली आहे परंतु महाराष्ट्र शासन या बाबतीत काहीही पावले उचलत नाही महाराष्ट्र शासनाने पुरोगामी राज्य आणि निर्णय घेणारे राज्य असं राज्य पुन्हा उभारावं अशी विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या