Social24Network
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. फुले-शाहु-आंबेडकरांची भूमी आहे. या पवित्र भूमीवर अपवित्र काम करणा-यांना कोणाचे पाठबळ आहे? सातत्याने दलित बहुजन समाजातील मुली/महिलांवर खुलेआम अत्याचार केल्या जात आहेत. राज्यातील मुख्यमंत्री फक्त पदं घेवून बसले आहेत का? दलित बहुजनांवर होणा-या अत्याचाराचा तपास का लावल्या जात नाही? राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झोपा काढत आहेत का? असा संतप्त सवाल आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे.
दरम्यान आज सातारामध्ये फलटण तालुक्यातील उपळवे गावात 15 वर्षाच्या 10 वी मध्ये शिकणा-या मुलीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न विहिरीत आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हे प्रकरण संशयस्पद असून पोलीस मात्र हाथरस प्रमाणे आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप पॅंथर केदार यांनी यावेळी केला आहे.
काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...
फलटण तालुक्यातील उपळवे गावातील 15 वर्षीय 10 व्या वर्गात शिकणारी तरूणी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर आज तीचा मृतदेह गावालतच्या विहिरीत छिन्नविच्छिन अवस्थेत आढळून आला आहे. तीच्या कमरेला ओढणी बांधली असून त्या ओढणीला दगड बांधण्यात आलेले होते. या हत्येमागे गावातील सवर्ण समाजातील लोकांचा हात असल्याचा आरोप पॅंथर दीपक केदार यांनी केला आहे. पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त करणारे कलम लावण्यात आले आहे. पोलीस आरोपींचा बचाव करण्यासाठी हे कलम लावण्यात आले असल्याचा अरोपही यावेळी केदार यांनी केला आहे. हे प्रकरण केवळ आत्महत्येचे नसून आरोपींवर कलम 302 अन्वये हत्या व अँट्राॅसिटी अँक्टचे आहे. त्यामुळे पोलीसांनी आणि गृहखात्याने या प्रकरणी गंभीर दखल घेवून या प्रकरणाचा तपास करावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा आँल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी दिला आहे.
आणखी संबंधित बातम्या...
सोशल मीडियावरील प्रकाश आंबेडकरांच्या बदनामीवर आँल इंडिया पॅंथर सेना आक्रमक
...अन्यथा पॅंथर स्टाईलने येवला रेल्वे स्थानकाचे नामांतर ; दीपक केदार यांचा इशारा
आँल इंडिया पॅंन्थर सेनेचा आक्रमक पावित्रा ; लवकरच राष्ट्रव्यापी जनआंदोलनाला सुरूवात...


0 टिप्पण्या