Social24Network
देशात दलित/बहुजनांचे अस्तित्व धोक्यात - दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, आँल इंडिया पॅंन्थर सेना
औरंगाबाद/प्रतिनिधी - मोदी सरकारला धर्माची सत्ता स्थापन करायची आहे. त्यासाठी त्यांचे सर्वाेतपरी प्रयत्न सुरू असुन दलित, बहुजन समाजावर अन्याय अत्याचार करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अन्यायग्रस्ताची जात पाहुन त्याला न्याय दिल्या जात आहे. त्यामुळे दलित, बहुजन समाजाचे अस्तित्व धोक्यात येत चालले असून लवकर या मनुवादी सरकारच्या विरोधात राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभारणार असल्याचा आक्रमक पावित्रा आँल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी घेतला आहे.
काय आहे मनीषा वाल्मीकी प्रकरण...
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील मनीषा वाल्मिकी या तरूणीवर दि. 14 सप्टेंबर 2020 रोजी चार नराधमांनी बलात्कार केला. केवळ बलात्कारच केला नाही तर तीच्या पाठीचा मनका मोडून टाकला, तीची मान मुरगाळून टाकली आणि जिभ छाटून टाकली. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली. तीच्यावर शासकीय रूग्णालयात योग्य उपचार करण्यात आला नाही. याच दरम्यान पोलीसांनी आरोपींना पाठीशी घातले. त्यामुळे देशभरातील दलित संघटना संतप्त झाल्या आणि देशभरात या प्रकरणावर आवाज उठविण्यात आला तेव्हा भेदारलेल्या सरकारने दोन दिवसांनी तीला दिल्ली येथे उपचारासाठी हलविले आणि काल तीचा दुर्देवी अंत झाला.
तर उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी....
उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून सरकार आणि जनतेचे रक्षक पोलीस मात्र आरोपींना पाठीशी घालत आहेत. कायद्यावर चालणा-या या देशामध्ये मोदी/योगी सरकार सैतान निर्माण करण्याचे काम करीत आहे. हा जातीयवाद, मनुवाद सरकार पोसत आहे. आपला मतदानाचा गठ्ठा कसा वाचविता येईल याकडे विशेष लक्ष दिल्या जात आहे. ही धर्माची सत्ता, जातीची सत्ता आपले माणसं कसे वाचविता येतील यात दंग झाली आहे. आणि म्हणून आम्ही उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करीत आहोत.
आरोपींचे एन्काउंटर करण्यात यावे...
ऐकीकडे भारत माता की जय म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच भारत मातेच्या बेटीची हत्या करायची असा आरएसएस आणि मनुवाद्यांचा धंदा आहे. दिल्लीमध्ये झालेलं निर्भया हत्याकांड आम्ही पाहिलं. मेनबत्या लावणारे जमा झाले. आंदोलनं उभे राहीले. पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गृहखाते सतर्क झाले. त्याही आंदोलनात आम्ही होतो. निर्भयाला न्याय मिळावा म्हणून आम्ही सुद्धा लढलो. परंतु केवळ दलित असलेल्या, बहुजन असलेल्या मनिषा वाल्मिकीला वेळेवर उपचार झाला नाही. सरकारने लक्ष न दिल्यामुळे तीला जीव गमवावा लागला तेव्हा सरकारने तात्काळ या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेवून त्यांचे एन्काउंटर अथवा त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आँल इंडिया पॅंन्थर सेनेने केली आहे.
0 टिप्पण्या