... तर सरकारने राज्यकारभार सोडून अधिकृत ‘‘तमाशा फड’’ चालवावा ; पॅंथर दीपक केदार यांची खोचक टीका

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

... तर सरकारने राज्यकारभार सोडून अधिकृत ‘‘तमाशा फड’’ चालवावा ; पॅंथर दीपक केदार यांची खोचक टीका

... so the government should step down and run the official "Tamasha Phad"; Panther Deepak Kedar's sharp criticism


(Photo courtesy Deepak Kedar's Facebook page)

Social24Network


आँल इंडिया पॅंन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात भांडवलदारांची सत्ता आहे. ही सत्ता शेतकरी, कामगार, दलित, बहुजनांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेवून त्यांना गुलाम करण्यासाठी सरसावलेली आहे. ही भांडवलदारांची मक्केदारी, व्यापा-यांची हुकुमशाही मोडून काढायची असेल, गुलामी नाकारायची असेल तर माझ्या बहुजन बांधवांनो आता एकत्र या आणि ही व्यवस्था उलथून टाका, असे भावनिक आवाहन यावेळी आँल इंडिया पॅंन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केले आहे.  

पुढे बोलतांना केदार म्हणाले की, फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव घेवून सत्ता स्थापन करायची आणि त्यांच्याच विचारांवर चालणा-या अनुयायांवर अन्याय-अत्याचार करायचे ही कुटनीती आता बहुजन समाजाच्या लक्षात आलेली आहे. तुम्ही चालविलेला हा ‘‘तमाशा’’ पुरोगामी महाराष्ट्रात आता जास्त काळ टिकणार नाही. राज्यात आता कोणतेही प्रश्न शिल्लक नाहीत, या आविर्भावात मुख्यमंत्री वर्षपूर्ती कार्यक्रम साजरा करतात. परंतु दलित बहुजन समजावर, शेतक-यांवर, कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध बोलत नाहीत. हे थांबवायचं असेल तर तमासगीरांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन पॅंथर दीपक केदार यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या