Social24Network
श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये यासाठी धडपडतो आहे असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्या वक्तव्यावर काल भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी समर्थनात्मक भाष्य केले असून मराठा समाजातील इगो प्राॅब्लेममुळे मराठा आरक्षणामध्ये समाजातील संघटनांमध्ये दुरावा होत चालला असल्याची खंत त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे. त्यामुळे उदयनराजेंनी व्यक्त केलेली खंत म्हणजे अँड. प्रकाश आंबेडकरांच्या ‘‘त्या’’ वक्तव्याचे समर्थन तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये मराठा नेत्यांच्या इगोमुळे मराठा समाजात दुरावा निर्माण होत असल्याची खंत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहीली तर समाजात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. अशी शंका खा. उदयनराजेंनी व्यक्त केली असून वेळ पडल्यास रथी-महारथींना सांष्टांग नमस्कार घालायला तयार असल्याचे खा. उदयनराजे म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते अँड. प्रकाश आंबेडकर वाचा सविस्तर...
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी 182 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत. त्यांचे एकमेकांशी नात्या गोत्याचे संबंध आहेत. नात्या गोत्याचं राजकारण ते करतात. आणि इतरांना या प्रक्रियेमध्ये येवू देत नाही हे वास्तव आहे. गरिब मराठ्याने आरक्षण मिळावे म्हणून लढा उभा केला. तो आता कोर्टात आहे. श्रीमंत मराठ्यांची सत्ता असतांना सुद्धा गरिब मराठ्याच्या बाजुने तो लढत नाही. गरिब मराठ्याला माझे आवाहन आहे की, त्यांनी त्यांचा लढा केल्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाही. यामध्ये गरिब मराठा श्रीमंत मराठ्याच्या विरूद्ध लढा द्यायला उतरतो का? हे येत्या काळात दिसणार आहेच. तो उतरला तरच त्याला आरक्षण मिळेल, तो उतरला नाही तर त्यांनी आरक्षणावरती पाणी सोडावं.
Udayan Raje Bhosale's support for Ambedkar's "that" statement ...
आणखी संबंधित बातम्या...
या कारणामुळे बाळासाहेब उदयनराजेंना ‘‘बिनडोक’’ म्हणाले...
बिनडोक म्हणजे शिवी नाही ; बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका समजून घ्या...
हा तर संघ-भाजपाचा कट - श्रीमंत कोकाटे
मागासवर्गीय अधिका-यांना पदोन्नतीतील आरक्षण मिळू नये म्हणून श्रीमंत मराठा डाव आखतोय


0 टिप्पण्या