काॅंग्रेस, डाव्यांना लकवा मारलाय का? - अ‍ॅड. आंबेडकरांचे टीकास्त्र

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

काॅंग्रेस, डाव्यांना लकवा मारलाय का? - अ‍ॅड. आंबेडकरांचे टीकास्त्र


Social24Network

देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला असतांना राष्ट्रीय पक्ष म्हणुन मिरविणा-या काॅंग्रेस, CPM, CPI या पक्षांचा कुठलाही अजेंडा दिसत नाही. गेल्या ४५ दिवसांपासुन देशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणुन अजुनही यांनी आपली भुमिका स्पष्ट केली नाही. काॅंग्रेस, CPM, CPI या पक्षांना लकवा मारलाय का? अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेतुन बोलत होते. 


पुढे बोलतांना आंबेडकर म्हणाले की, दिल्ली येथील शाहिन बागमध्ये जेव्हा एनआरसी आणि सीएए विरोधात मुस्लिम उतरला होता. तेव्हा त्याच्या रक्षणासाठी शिख बांधव धावुन आला होता. ही जाणिव जोपासुन वंचित बहुजन आघाडीमधील मुस्लिम नेत्यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणुन २७ जानेवारी रोजी राज्यभरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मुस्लिम धर्मगुरूंनी पाठिंबा दिला असुन मुस्लिम समाजाने जास्तित जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. 


आरएसएस, बीजेपीचा राजकारणातील धार्मिक अजेंडा हाणुन पाडा 

धर्माच्या नावाखाली जनतेला भडकविण्याचे काम बीजेपी, आरएसएस करीत आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या देशाचे मालक बनु पाहत आहेत. जो पर्यंत या देशाचा राजकीय अजेंडा धार्मिकतेवर आधारीत राहील तो पर्यंत इथला मुस्लिम टार्गेटच राहणार आहे. आणि मुस्लिम टार्गेट राहीला तर त्याचा फायदा हा बीजेपी आरएसएसलाच होणार आहे. म्हणुन बीजेपी आरएसएसचा राजकारणातील धार्मिक अजेंडा हाणुन पाडण्याचे आवाहन यावेळी अ‍ॅड. आंबेडकरांनी केले आहे. 


२७ चे आंदोलन देशाचा राजकीय अजेंडा बदलवेल

माणुस आणि त्याचे प्रश्न हा ज्या दिवशी राजकीय पक्षांचा अजेंडा होईल त्या दिवशी धार्मिक अजेंडा रद्द होईल. असे झाले तर एनआरसी, सीएए रद्द झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणुन २७ जानेवारी रोजी होणारे वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन हे मुस्लिमांना स्वतःची जागा निर्माण करणारे आंदोलन असणार आहे. त्यांना उभे करण्यासाठीचे जागे करण्याचे आंदोलन असणार आहे. एकदा ते जागे झाले की देशाचा राजकीय अजेंडा बदलल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या