रिहानाच्या ट्वीटने वातावरण तापले ; आंबेडकर म्हणाले...

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिहानाच्या ट्वीटने वातावरण तापले ; आंबेडकर म्हणाले...


Social24Network

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून देशाचे वातावरण चांगलेच तापले असुन विदेशातुन मिळत चाललेल्या पाठिंब्याने शेतकरी आंदोलन व्यापक स्वरूपात उभे राहत आहे. मुंबई येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, ज्यांना शेतकरी आंदोलनाला विरोध करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा विरोध कशासाठी ही भुमिका स्पष्ट करावी. 


प्रसिद्ध पाॅप स्टार रिहानाने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्वीटमुळे अनेक क्रिकेटपटुंनी तीला भारतातील अंतर्गत विषयात नाक खुपसण्याची गरज नाही, असा सल्ला दिला आहे. दरम्यान सचिन तेंडुलकर यांनी रिहानाला सल्ला देतांना म्हटले आहे की, भारताच्या सार्वभौमत्वाशी खेळण्याचा कुणाला अधिकार नाही. देशाअंतर्गत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बाहेरच्यांनी सहभाग घेण्याची गरज नाही. 


यावर बोलतांना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांनी दिलेली कमेंट ही शेतक-यांच्या बाजुची आहे की विरोधात हे अजुन स्पष्ट झालेले नाही. तेंडुलकरांनी ट्वीट करतांना एवढंच म्हटलेलं आहे की, ज्यांचा या देशाशी संबंध नाही ते आपल्या सार्वभौमत्वाशी खेळत आहेत. शेतकरी आंदोलनासंबंधी इतरांनी पाठिंबा दिला, समर्थन दिले यासंदर्भाने ती कमेंट आहे. परंतु सचिन तेंडुलकर यांची भुमिका काय आहे? किंवा लता मंगेशकर यांची शेतकरी आंदोलनाबद्दलची भुमिका अजुनही स्पष्ट झालेली नाही. ती त्यांनी स्पष्ट करावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या