वंचितांना सत्तेत पाठविण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांच्या वैचारिक सहकार्याची गरज ; रेखा ठाकुर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वंचितांना सत्तेत पाठविण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांच्या वैचारिक सहकार्याची गरज ; रेखा ठाकुर

 फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या विभागीय समन्वयकांच्या बैठकीत कृती आराखडा  तयार 


औरंगाबाद प्रतिनिधी- महाराष्ट्रात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य माणसाला सतेत पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय म्हणून आज काम करत आहे. निवडणुका येतील जातील पण सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वंचित अतिशय चोखपने लोकशाहीच्या मार्गाने लढत असुन या प्रश्नांना  वाचा फोडत आहे. मा. बाळासाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात येत्या काळात वंचितांना सत्येत घेऊन जान्याचा निश्चय केला आहे. हा निर्धार पूर्ण करायचा असेल तर महाराष्ट्रातील कानाकोप-यात समाजातील विशिष्ट स्तरावर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या बुद्धिजीवी  वर्गाने आता या विद्वत सभेच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहने गरजेचे आहे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या (प्रभारी) प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केले. त्या औरंगाबाद येथे दि. 9 आॅगस्ट रोजी फुले-आंबेडकर विद्वत सभा आयोजित बैठकीतून बोलत होत्या.


पुढे बोलतांना ठाकूर म्हणाल्या की, घराणेशाहीचा कचाट्यात सापडलेल्या शिक्षणसंस्था त्यातून पसरविल्या जाणारा बनावट पुरोगामी विचार हा कधीच सर्वसामान्यांना शिक्षण, रोजगार, व सन्मानाची संधी उपलब्ध करून देऊ शकणार नाही. पुरोगामी विचाराच्या बाता मारून मनुवादाचे जतन करणाऱ्या कांग्रेस- राष्ट्रवादी किंवा तत्सम राजकीय पक्षाचा बुरखा फाडण्यासाठी आता वंचित समुहातुन येणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांनी समोर यायला पाहिजे. त्यांच्या सहकार्यानेच वंचितांना सत्तेत पाठवु तेव्हा बुद्धीजीवी  वर्गाने  वैचारिक व दिशादर्शक चळवळ वंचितांसाठी उभी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी सहकार्य केल्यास आपण सत्तेत जाऊ. 

        


याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रनबागूल , वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष सविता मुंडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विद्वत् सभेचे नवनियुक्त राज्य समन्वयक  प्रा. डॉ. मनोज निकाळजे यांनी भूमिका मांडली तर राज्य समन्वयक प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी आढावा सादर केला, प्रा. भारत शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी प्रा. डॉ. प्रज्ञा साळवे, गाथा वाघमारे, अनिता गोलकोंडा, प्रा. किशोर वाघ, प्रा. गजेंद्र लांडे, डॉ. बलभीम वाघमारे, डॉ. माधव पुणेकर, प्रा. अमोल भगत, प्रा. सोनाजी इंगळे, डॉ. विठ्ठल कर्णे, विनायक खडसे, प्रा. भीमराव उबाळे, प्रा. अवचार, ओंकेश बनसोडे, भास्कर हिवाळे, डॉ विशाल ओ०हाळ, डॉ सुरवाडे, डॉ किशोर वाघ, जयपाल सुकाळे, अक्रमखान, भीमराव वाघमारे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या