प्रा. अविनाश डोळस यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. अविनाश डोळस यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर

रविवारी मुंबई येथे पुरस्काराचे वितरण

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोशिएशनच्यावतीने दरवर्षी बाबुराव बागूल, डॉ. म. ना. वानखेडे आणि म. भि. चिटणीस यांच्या स्मरणार्थ साहित्य, सामाजिक क्षेत्रांमध्ये मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना, संस्थाना पुरस्कार देण्यात येतो.

हे पुरस्काराचे दुसरे वर्ष असून रविवार, दि. २६ मार्च २०२३ रोजी सायं. ५ वा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, नायगांव-दादर (पूर्व) येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.

सुप्रसिध्द लोकशाहीवादी नेते हुसैन दलवाई यांच्या हस्ते कॉ. शरद पाटील (मरोणोत्तर), प्रा. अविनाश डोळस (मरोणोत्तर) आणि साधना साप्ताहिक यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोशिएशनचे अध्यक्ष शिवा इंगोले असणार आहेत. यावेळी प्रा. डॉ. प्रकाश खरात, नागपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून

उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. अविनाश डोळस फाउंडेशनच्या वतीने जॅकलिन डोळस, डॉ. संजय मून, सिद्धार्थ आल्टे, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. प्रज्ञा साळवे, डॉ. किशोर साळवे,डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. मधुकर खंदारे, आयु. अनिल खरतडे, डॉ. प्रकाश सिरसाट, प्रा. भारत सिरसाट, डॉ. रेखा मेश्राम आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या