औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स-डे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर डे विधी सेवा पुरस्कार सोहळा कार्यक्रम शनिवारी (ता. १७) आयोजीत करण्यात आला आहे. तापडीया नाट्यमंदीर येथे शनिवारी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष व्ही. डी. साळुंके यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक डॉ. प्रदिप आगलावे, डॉ. अनंत राऊत हे राहणार आहेत. यावेळी अँड. विजय साकोळकर, अँड. एस. बी. बाखरिया, अँड डी. आर. शेळके, अँड. उत्तम तेलगांवकर, अँड.एस. एस. काझी, अँड. शाम अरोरा, ॲड. कैलास बगनावत, अँड. योगेश फाटके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर डे विधी सेवा पुरस्कार अँड. विजय साकोळकर, अँड. नितीन चौधरी, अँड. एस. एस. काझी, अँड अभय राठोड, अँड. सुनील मगरे, अँड. योहान मकासरे यांना देण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजक तथा स्वागताध्यक्ष अँड. एस. आर. बोदडे यांनी केले.
0 टिप्पण्या