नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात ‘सम्यक’च्यावतीने परिसंवादाचे आयोजन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात ‘सम्यक’च्यावतीने परिसंवादाचे आयोजन


औरंगाबाद: केंद्र सरकारद्वारा शैक्षणिक धोरण 2020 राबविण्यास सुरूवात होत आहे. हे शैक्षणिक धोरण समस्त विद्यार्थ्यांच्या विरोधात असून या धोरणावर विस्तृत चर्चा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना या धोरणाबाबत जागृत करण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने दि. 26 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये आयोजित केले आहे.

या परिसंवादाचे उद्घाटन फुले-आंबेडकर विद्वत सभेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भारत सिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रो. डॉ. शुजा शाकीर हे असणार आहेत. वक्ते म्हणुन प्रसिद्ध विचारवंत डॉ. हमराज उईके, सिद्धार्थ शिनगारे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या