‘ओबीसी समाजासमोरील आव्हाने’ विषयावर रविवारी चिंतन शिबिर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

‘ओबीसी समाजासमोरील आव्हाने’ विषयावर रविवारी चिंतन शिबिर


औरंगाबाद/प्रतिनिधी - फुले- आंबेडकरी विचारवंत स्मृतिशेष प्रा. अविनाश डोळस यांच्या जयंती निमित्त प्रा. अविनाश डोळस फाउंडेशनच्या वतीने रविवारी दि. 11 डिसेबर रोजी ओबीसी समाजाचा मेळावा व चिंतन शिबिराचे आयोजन वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 11ः30 वाजता करण्यात आले आहे. 


चिंतन शिबिराच्या पहिल्या सत्रामध्ये ‘ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्ष म्हणुन वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन राठोड उपस्थित राहणार आहेत. तर वक्ते म्हणुन सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे के. ई. हरिदास, भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे सुदाम चिंचाणे उपस्थित राहणार आहेत. 



दुस-या सत्रामध्ये ‘मंडल आयोगाची अंमलबजावणी: स्थिती व वस्तुस्थिती या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाझशनचे संस्थापक शब्बीर अन्सारी असणार आहेत. तर वक्ते म्हणुन ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, बारा बलुतेदार महासंघाचे कल्याण दळे उपस्थित राहणार आहेत. 


या चिंतन मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय मून, डॉ. प्रज्ञा साळवे, सिद्धार्थ आल्टे, प्रा. प्रकाश सिरसाट, प्रा. भारत सिरसाट, डॉ. मधूकर खंदारे, डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. उत्तम अंभोरे आदींसह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या