बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय तत्काळ रद्द करा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय तत्काळ रद्द करा

सम्यक विद्यार्थी आंदोलनाची विद्यापीठात निदर्शने

औरंगाबाद/प्रतिनिधी - पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांवर लादलेला बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, पेट २०२१ ची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावी, शैक्षणिक वर्ष २०२२ ची पेट लवकरात काढावी, पदवी परीक्षे दरम्यान झालेल्या गोंधळामुळे ज्या विद्यार्थ्यांना पेपर देता त्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी आदींसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज (ता. ३० डिसें.) सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने प्रा. प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. 

सदरील मागण्यांचे निवेदन प्रशासनाच्या वतीने प्र कुलगुरू डॉ. श्याम सिरसाट यांनी स्वीकारले. लवकरात लवकर याबाबत निर्णय न झाल्यास "विद्यापीठ बंद"चा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे माजी प्रदेश महासचिव प्रा. प्रकाश इंगळे यांनी दिला. 

यावेळी विविध विभागातील पीएचडी संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या