विचाराने अजरामर असलेले प्रा.पांडुरंग आठवले यांच्या स्मृतीस सलाम

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विचाराने अजरामर असलेले प्रा.पांडुरंग आठवले यांच्या स्मृतीस सलाम

मोठ्या मनाचे मोठे बंधू प्रा. पांडुरंग भाऊ आठवले यांच्या चौथ्या स्मृतिदिनी डोळे पाणावल्याशिवाय राहतील असे शक्य नाही....मनाला चटका लागावा तशी वार्ता चार वर्षांपूर्वी म्हणजे २० मार्च २०२५


रोजी सकाळी सुमारे ६:०० साजरा फोनवरून कळली व वार्ता कानावर पडताच पायाखालची वाळू सरकावी, जिवातून जीव निघून जावा, डोळ्यापुढे अंधार यावा असा विलक्षण अनुभव त्या दिवसांपर्यंत पहिलाच होता. क्षणाचा विलंब न लागता प्रा.आठलेलचा जीवनप्रवास डोळ्यासमोर उभा राहिला, अत्यंत चिकाटी, गरिबीतून, जिद्दीने, काटकसरीने अभ्यास करून प्राध्यापक होणारे तर माझ्या नजरेत पहिलेच प्राध्यापक होते तेही विदर्भाच्या मातीतील इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांच्या लौकिक खूप मोठा होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे प्रमाण शिक्षण क्षेत्र डोळ्यासमोर ठेऊन केवळ बाबासाहेबांच्या नावाचे विद्यापीठ आहे म्हणून इथे उपाशी पोटी राहून, बिकट परिस्थितीत यशस्वी प्राध्यापक होणे म्हणजे दिव्यच.गावाकडे घरी पोटभर खायला असूनसुद्धा इथे शिकून आई वडील, गावचे नाव मोठे करण्यासाठी अर्धपोटी राहणे स्वीकारताना काय संघर्ष करावा लागतो याची कल्पना मलासुद्धा थोडीफार आहे.स्वतः शिकत असताना माझ्या लहान भावाला (डॉ.मिलिंद आठवले) याला कसं शिक्षणाच्या प्रवाहात  आणावे याकरिता शर्थीचे प्रयत्न करून त्यांना जवळपास शिक्षणासोबत फारकत झालेल्या डॉ.मिलिंद आठवलेंना औरंगाबाद ला आणून शिकवले, योग्याबते मार्गदर्शन करून स्थायिक केलं ही सर्व किमया प्रा.पांडुरंग आठवलेचीच.आज मिलींद आठवले हजारो तरुण तरुणींना  मार्गदर्शक म्हणून लाभतात हे सर्व प्रा.पांडुरंग आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे अश्या महान विचार व कर्तृत्ववान प्रा.आठवलेंचा अपघात झाला यावर विश्वास बसने शक्य नव्हते तरी सत्य नाकारता येत नाही, वार्ता माझ्या कानावर पडायच्या अगोदर सात आठ तास निघून सुद्धा गेले होते.

           डॉ.मिलिंद आठवले जरी त्याचे सख्खे लहान बंधू असले तर मला त्यांनी लहान।भावापलीकडे प्रेम, जिव्हाळा व मार्गदर्शन केले होते. मग अभ्यास, कार चालवणे, माझे वाढलेले वजन कमी करणे या व कित्येक छोट्या मोठ्या बाबींसंदर्भात सुध्दा माणसानं कसं जागरूक असावं हा त्यांचा आग्रह असायचा हे मी कमी दिवसांत अनुभवलं होतं.

          शिक्षण, आरोग्य, कुटुंबा सोबत समाजकारण करत राहावं हा त्यांचा ध्यास असायचा. 

      आज चार वर्ष झाली मात्र असं काही विपरीत गेलं यावर आजही विश्वास बसत नाही, चालतं- बोलते विद्यापीठ आपल्यातून निघून जाणं ही बाब मनाला पटत नाही.

             आज स्मृतिदिन यानिमित्ताने प्रा. आठवले यांच्या विचाराला, कार्याला व स्मृतीस विनम्र अभिवादन...!


प्रा.शिलवंत गोपनारायण, 

सामाजिक कार्यकर्ते

छत्रपती संभाजीनगर

संपर्क-9527368431

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या