दिशाभूल करणारी माहिती पसरवणा्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी - आगामी जनगणनेची तयारी सुरू झाली असून या जनगणनेत बौद्ध समाजाने अत्यंत काळजीपूर्वक व मुद्देसूद माहिती भरावी, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे माजी औरंगाबाद जिल्हा महासचिव, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष तथा पाली व बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यास प्रा. भारत सिरसाट यांनी केले आहे.
'सोशल 24 नेटवर्क'शी बोलतांना प्रा. भारत सिरसाट म्हणाले की, आगामी जनगणनेत बौद्ध समाजाने आपला धर्म बौद्ध म्हणुन नोंद करावा, प्रवर्ग अनुसूचित जाती (SC) म्हणुन नोंद करावा तसेच जात महार म्हणुन नोंद करावी, भाषेच्या रकान्यामध्ये मराठी भाषेसह पाली भाषा नमूद करावी. जनगणनेमध्ये बौद्धांनी कोणती माहिती भरावी याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक तसेच विचारवंत सक्रिय झाले असून त्यांनी समाजाची दिशाभूल करणारी चुकीची माहिती पसरवू नये, समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


0 टिप्पण्या