शेगाव (प्रतिनिधी) - भय्यासाहेब आंबेडकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात अनेकदा दौरे केले आहेत. त्यांचा अनेकदा या जिल्ह्याशी संबंध आला आहे. याची ऐतिहासिक नोंद या जिल्ह्याने घेतली असून भय्यासाहेबांचा जगातील पहिला पुतळा नांदुरा तालुक्यातील वडनेर भुरजी येथे उभारला हि इतिहास जिवंत ठेवणारी घटना असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी इतिहासकार प्रा प्रकाश जंजाळ यांनी केले. ते सम्यक विद्यार्थी आंदोलन, बुलढाणा जिल्हा आयोजित सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यान कार्यक्रमातून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस डॉ अनिल वानखडे हे होते.
प्रमुख उपस्थिती म्हणून भारिप बमसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भोजने, भारीपचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष प्रा विष्णू उबाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनिता डोंगरे, सम्यकचे जिल्हाध्यक्ष प्रवीण विरघट, नगरसेविका प्रीतिताई शेगोकर, गणेशभाऊ चौकसे, अनिल वाकोडे, भाई बाबुराव सरदार नानाराव विरघट, गौतम इंगळे, एड अनिल इखारे, विद्वत सभेचे जिल्हाध्यक्ष अतुल सिरसाट आदी उपस्थित होते.
शेगाव शासकीय विश्राम गृह सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण विरघट यांनी केले. सूत्रसंचालन के के शेगोकर यांनी केले तर आभार दादाराव अंभोरे यांनी मानले. यावेळी अजय साळवे, रोशन इंगळे आनंद इंगळे संजय वाकोडे अक्षय धुंधले प्रवीण उमाळे आदीसह मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या