पारस (प्रतिनिधी) - हि पृथ्वी कामगारांच्या तळ हातावर उभी असल्याचे अण्णा भाऊ साठे यांनी सांगीतले होते परंतु कामगारांचे हात छाटण्याचे प्रयत्न सरकार कडून होत असून कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व्यापक स्वरूपाचा लढा महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाच्या माध्यमातून लवकरच उभारल्या जाणार असून त्याला भारिप बहुजन महासंघाचा पूर्ण पाठींबा राहील असे प्रतिपादन बाळापूर पातूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बळीरामजी सिरस्कार यांनी केले.
ते पारस येथे आयोजित महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघ आयोजित पारस शाखा कार्यालय उद्धाटन समारंभातून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाचे प्रदेश सरचिटणीस एस डी सातकार, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महाराष्ट्र राज्य बहुजन विद्युत बहुजन अधिकारी कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष डॉ आर एच वर्धे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट, जि प सदस्या शोभाताई शेळके, जि प उपाध्यक्ष जमिरुल्ला पठाण, महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाचे पारस शाखा अध्यक्ष सूरज सोनोवणे, जिल्हा महासचिव दीपक गवई, भारीपचे जिल्हासचिव गौतम सिरसाट, भारीपचे नेते बाबारावजी तेलगोटे प स सदस्य गजानन लांडे, सम्यकचे तालुकाध्यक्ष विकास अवचार, पत्रकार उत्तमराव दाभाडे आदी उपस्थित होते
भारिप बमसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे बोलतांना म्हणाले की, देशात सद्या दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम सरकार करीत असून इथला कामगार, शेतकरी, व्यावसायिक, शिक्षक, महिला, विद्यार्थी आणि या देशाचे नागरिक यांचा आवाज हुकूमशाहीच्या माध्यमातून सरकार दाबू पाहत आहे. कर्मचा-यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिल्या जात नाही, महिला सुरक्षितपणे राहू शकत नाही आता हे सरकार उलथून टाकण्याची वेळ आली असून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करा.
सातकर बोलताना म्हणाले की, कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी आम्ही सातत्याने तत्पर असून जिल्ह्यात कामगार संघटनेचे काम ताकदीने उभे करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप वानखडे यांनी केले तर आभार सुभाषभाऊ इंगळे यांनी मानले.
यावेळी माजी तालुकाध्यक्ष भारत निखाडे, एड प्रशांत उमाळे, संजय वाकोडे, रफिक भाई, राहुल इंगळे, रामराव सावळे, विजय डोंगरे, सचिन इंगळे, निरंजन सिरसाट, सुमित खंडारे, अश्वजीत सिरसाट, देवराव वानखडे, गौतम घ्यारे, सुहास इंगळे, भारत गायकवाड, नितीन मोहोड, नितेश तायडे, विनोद उमाळे, रणजित तायडे, श्रीकृष्ण भारसाखडे, चंदू दांडगे, रोहित वानखडे, आकाश गायकवाड, प्रशांत मापरे, निखिल शेलार, धनराज तावडे, नितेश सोनोवणे, विक्की वानखडे, अक्षय दाभाडे, कमलेश तेलगोटे, विवेक सोनोवणे आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या