सम्यकच्या शिक्षण बचाव मोर्चाची जिल्ह्यात एकाच चर्चा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सम्यकच्या शिक्षण बचाव मोर्चाची जिल्ह्यात एकाच चर्चा

अकोला (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘शिक्षण बचाव मोर्चा’ उद्या (दि. 24) भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतिने आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरु असून प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. या मोर्चाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष मा. महेश भारतीय आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक हे उपस्थीत राहणार असून या मोर्चाचे नेतृत्व सम्यकचे जिल्हाध्यक्ष अमोल समाधान सिरसाट हे करणार आहेत. हा मोर्चा दुपारी 12 वाजता गांधी जवाहर बाग ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे. 
         यासंदर्भात बोलतांना नितेश किर्तक म्हणाले की, या संपूर्ण मोर्चाची पूर्ण तयारी झाली असून जिल्ह्यातील बहुजन विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 
उद्याचा मोर्चा हा हजारो विद्यार्थी - विद्यार्थिनीच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकणार असून या मोर्चामध्ये प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक सर्कलमधून आणि प्रत्येक गावातून विद्यार्थी येऊन आपल्या मागण्यासादर्भात मा. जिल्हाधिकारी यांना जाब विचारणार असल्याची प्रतिक्रिया सम्यकचे जिल्हाध्यक्ष अमोल सिरसाट यांनी बोलतांना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या