विदर्भ दौ-यातील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर प्रदेशाध्यक्षांची सम्यकला गाडी भेट

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भ दौ-यातील उत्स्फूर्त प्रतिसादानंतर प्रदेशाध्यक्षांची सम्यकला गाडी भेट

अकोला (प्रतिनिधी)- गेल्या चार दिवसांपासून सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा महेशजी भारतीय हे विदर्भ दौ-यावर आले होते. या दौ-यामध्ये त्यांनी अकोला, बुलढाणा, अमरावती आणि वाशीम या चार जिल्ह्यामध्ये शिक्षण बचाव मोर्चा काढला. हे सर्व मोर्चे यशस्वीपणे संपन्न झाल्याने भारतीय यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आनंद व्यक्त करत अकोला, बुलढाणा अमरावती आणि वाशीम जिल्ह्यात सम्यकचे कार्य अश्वगतीने चालावे यासाठी महिंद्रा कंपनीची बुलेरो (XL) हि गाडी बुक केली असल्याचे सांगितले.
या चार दिवसीय दौ-यामध्ये त्यांनी मोर्चाँ बरोबरच अकोला जिल्ह्यातील आठ गावांमध्ये ग्राम शाखाचे उद्धाटन केले. अत्यंत कमी वेळेमध्ये चार जिल्ह्याचा मोर्चा आटोपून ग्राम शाखा उद्धाटन करताना या गावचे त्या गावी जाण्यासाठी त्यांना झालेला त्रास लक्षात घेत आणि विद्यार्थी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना असा प्रचार - प्रसारासाठी त्रास होऊ नये यासाठी हि भेट आम्हाला मिळाली असल्याचे सम्यकच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना भारतीय म्हणाले की, श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांना प्रचार प्रसार कार्यामध्ये मदत व्हावी यासाठी मी महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या वतीने अकोला, बुलढाणा, अमरावती आणि वाशीम या जिल्ह्यांसाठी आज गाडीची बुकिंग केली असून या चार जिल्ह्याना जिल्हा, तालुका, महाविद्यालय, सर्कल, ग्राम शाखा निवडण्यासाठी मदत होईल. आणि लवकर हि गाडी संघटनेच्या प्रचारासाठी मिळणार आहे.

गाडीची चावी कार्यकर्त्यांना प्रदान करतांना प्रदेश अध्यक्ष मा महेश भारतीय.

यावेळी अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक यांना  सोबत सम्यकचे अकोला जिल्हाध्यक्ष अमोल समाधान सिरसाट, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रवीण विरघट, अमरावती जिल्हाध्यक्ष अंकुश वाकपांजर सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदीप वानखडे, अकोला जिल्हा संघटक राजकुमार दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष हितेश जामणिक, अकोला महानगर महासचिव पवन गवई, जिल्हा सदस्य बंटी वानखडे, डॉ मनीष खंडारे, प्रकाश प्रधान आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

10 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
अभिनंदन
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन जिंदाबाद
Unknown म्हणाले…
अभिनंदन
सम्यक अकोला टिम
आपल्या कार्याची पावती व सफल पर्यन्तांना यश येवों!.
Siddharth Kharath म्हणाले…
अकोला टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Siddharth Kharath म्हणाले…
अकोला टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
अनामित म्हणाले…
अभिनंदन.
अनामित म्हणाले…
बाबाराव तेलगोटे,बाळापूर यांचे कडून सर्वांचे अभिनंदन.