सागद येथे 'सम्यक'च्या ग्राम शाखेचे उदघाटन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सागद येथे 'सम्यक'च्या ग्राम शाखेचे उदघाटन

अकोला (प्रतिनिधी)- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय हे सद्या विदर्भ दौ-यावर असून आज अमरावती जिल्हा शिक्षण बचाव मोर्चा दुपारी आटोपून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका क्षेत्रातील शेवटचे गाव असलेल्या सागद येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या ग्राम शाखेचे उदघाटन त्यांनी केले.
     आज अमरावती येथील मोर्चा आटोपून तब्बल रात्री १०:३० वाजता सागद येथे पोहोचून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी सम्यकचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदीप वानखडे, सम्यकचे बाळापूर तालुकाध्यक्ष विकास अवचार, कामगार युवा नेते सुरज सोनोवणे, रवी थेटे, सुहास इंगळे, नवनिर्वाचित शाखाध्यक्ष श्रीकृष्ण भारसाखळे आदी उपस्थित होते.



         गेल्या तीन दिवसांपासून भारतीय हे अकोला, बुलढाणा, अमरावती आणि वाशीम आदी जिल्ह्यांमध्ये शिक्षण बचाव मोर्चाच्या निमित्ताने पारस येथील विश्रामगृहात थांबले होते. या घटनेने सम्यकचा झंझावात संपूर्ण जिल्ह्यात जोरात दिसून आला असल्याची चर्चा सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या