"बाबासाहेबांनी रमाईला लिहिलेल्या प्रत्येक पत्रात भय्यासाहेब" - भीमरावजी तायडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

"बाबासाहेबांनी रमाईला लिहिलेल्या प्रत्येक पत्रात भय्यासाहेब" - भीमरावजी तायडे


औरंगाबाद दि 18 (प्रतिनिधी )डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या वेळी रमाईला पत्रे लिहिली त्या प्रत्येक पत्रात त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलाची म्हणजे भय्यासाहेबांची आस्थेने चौकशी केल्याची आढळते ! पण या माय बाप आणि मुलाच्या नात्याला वेगळया पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न काही लेखकांनी केला आणि जणू काही त्यांच्या नात्यात दुरावा होता असेही लिखाण केले ! सम्पूर्ण समाजाचे बाप असणारे बाबासाहेब आपल्या एकुलत्या एक मुलावर प्रेम करणार नाहीत असे होऊच शकत नाही , असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष यांनी औरंगाबाद येथे केले !                       
सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान औरंगाबाद च्या वतीने आयोजित भय्यासाहेब आंबेडकर स्म्रुतिदिन सोहळयात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते ! सोबत विचारमंचावर उर्मिला तायडे , जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते प्राचार्य डी एल हिवराळे , चंद्रभान पारखे ,कवयत्री  क्रुष्णामाई अनंतराव मांजरमकर , अध्यक्षस्थान जेष्ठ विधिज्ञ माजी न्यायधिश अँड बी एच गायकवाड, प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा भारत शिरसाट यांची उपस्थिती होती !                       
प्राचार्य डी एल हिवराळे आपल्या मनोगतात म्हणाले की ,जगाचे  सिम्बॉल ऑफ नालेज असणारे बाबासाहेबांचे पुत्र ही समाजाचे पॉवर स्टेशन होते ! भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दोन्ही धुरा त्यांनी यशस्वीपणे संभाळत आपले कुटुम्ब ही सांभाळले ! शेवटपर्यंत ते स्वाभिमानाने राहिले ! आमच्या साठी ते बाबासाहेबांप्रमाणे आदर्शवत आहेत !                        अँड बी एच गायकवाड आपल्या अध्यक्षीय समारोपात म्हणाले की विधिमंडळात आमदार असणारे भय्यासाहेब समजतील सर्व विद्यार्थी हित पाहताना महाविद्यालये सकाळी असावीत , विद्यार्थ्याना दरमहा शिष्यवृत्ती मिळावी तसेच महागाई नुसार त्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ व्हावी , महाराष्ट्रात क्रुषि विद्यापीठ सुरू करावे आणि सहकारी सोसायट्या सुरू करून त्यात सर्व समाजाने सहभागी व्हावे अश्या वैश्विक संकल्पना घेऊन त्यांनी त्यांची मते विधिमंडळात मांडली !
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश आटोटे यांनी केले तर आभार आनंद चक्राणारायन यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या