आदिवासी महिला हल्ला प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे ; वंचित बहुजन आघाडीची मागणी.

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी महिला हल्ला प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे ; वंचित बहुजन आघाडीची मागणी.

श्रीगोंदा (प्रतिनिधी):- श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील आदिवासी महिलेवर झालेल्या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.  भारिप बहुजन महासंघ, पारधी समाज आराखडा कृती समिती, महिला समस्या निवारण केंद्र श्रीगोंदा, आदिवासी विचारमंच व लोकाधिकार आंदोलन या संघटनांचे प्रतिनिधी बापू ओहळ, प्रमोद काळे, द्वारका पवार, आसाराम काळे,शरद काळे, विलास काळे, संतोष गर्जे, ज्योती भोसले, लता सांगळे, लता सावंत, सोमनाथ भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर प्रकरणातील सर्व आरोपींचा जामीन तात्काळ रद्द करावा, पीडितांना तात्काळ आर्थिक व वैद्यकीय मदत मिळावी, पीडित कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे, इत्यादी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे दि. १२ सप्टेंबर रोजी शेतात शेळी गेली व तिने कांदा पिकाचे नुकसान केले. या कारणावरून भानगाव येथील जयसिंग वाघस्कर, संतोष वाघस्कर, मनोहर वाघस्कर व जे.सी.बी. चालक लुटे यांनी आदिवासी महिलेचा पती संदीप काळे यास जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीपासून आपल्या पतीला सोडविण्यास गेलेल्या आदिवासी महिलेला देखील जबर मारहाण करून विवस्त्र करण्यात आले याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलेल्या महिलेस पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. तसेच तुम्ही लोक खोट्या तक्रारी दाखल करतात असे म्हणत टाळाटाळ केली. त्यानंतर सदर महिला व तिच्या कुटुंबियांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व नाशिकचे पोलिस आयुक्त यांचेकडे दाद मागितल्या नंतर १५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून घेण्यात आला. मात्र पोलिसांनी आरोपींना अटक करुन जामिनावर सोडून दिले. या प्रकरणी आदिवासी पीडित महिला व तिच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली. तत्पूर्वी या शिष्टमंडळाने श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील पीडित महिलेच्या घरी जाऊन तिची व तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी महिला समस्या निवारण केंद्राच्या सदस्या जयश्री काळे, सुनीता बनकर, राणी कोळपे आदी महिला उपस्थित होत्या.

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील पीडित आदिवासी कुटुंबातील महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसिलदार रोहिणी नरे यांना निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव, बापु ओहळ, द्वारका पवार, प्रमोद काळे, आसाराम काळे, संतोष गर्जे, ज्योती भोसले, सोमनाथ भोसले, टाबर भोसले आदी उपस्थित होते.

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील पीडित आदिवासी कुटुंबातील महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी तुकाराम मुंढे यांना निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक अ‍ॅड. अरुण जाधव, बापु ओहळ, द्वारका पवार, प्रमोद काळे, आसाराम काळे, संतोष गर्जे, ज्योती भोसले, सोमनाथ भोसले, टाबर भोसले आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या