खासदारांच्या गावातील विद्यार्थ्याचा कल 'सम्यक'कडे

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

खासदारांच्या गावातील विद्यार्थ्याचा कल 'सम्यक'कडे

अकोला (प्रतिनिधी) - अकोला जिल्हयाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार यांच्या पळसो बढे येथे भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाची शाखा सम्यकचे प्रदेश अध्यक्ष मा महेश भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली. यावेळी सम्यकचे विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक, जिल्हाध्यक्ष अमोल सिरसाट, सम्यकचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदीप वानखडे, सम्यकचे अकोला जिल्हा संघटक राजुमार दामोदर, जिल्हा उपाध्यक्ष हितेश जामणिक, आदी उपस्थित होते.
           महेश भारतीय हे सद्या विदर्भ दौ-यावर असून आज संपन्न होत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या शिक्षण बचाव मोर्चाला अकोला येथून प्रयाण करतांना या शाखेचे त्यांनी उदघाटन केले. शेकडो विद्यार्थ्यांनी यवेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनामध्ये प्रवेश घेतला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या