मुम्बई , दि १०( प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर नायक २०१९ या राज्यव्यापी वाचन ,लेखन व वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नव्या युगाचे निर्माते आहेत.त्यांच्या चळवळीचे खरेखुरे इंधन हे त्यांनी विविध ठिकाणी दिलेल्या भाषणामध्ये व स्वत: लिहिलेल्या मूळ पुस्तकांमध्ये आहे.. त्यांचे मूळ साहित्य न वाचताच सामाजिक परिवर्तनाची अपेक्षा करण्यात येते.म्हणून बाबासाहेबांना अपेक्षित असलेले नायक समाजात निर्माण होण्यासाठी समाजातिल विचारवंत, प्राध्यापक , प्रशासक व सर्व क्षेत्रातिल कार्यरत मान्यवरांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मूळ पुस्तकांवर आधारीत राज्यस्तरीय वाचन, लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे...
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सर्व वयोगट भाग घेऊ शकतील.
ही स्पर्धा तीन टप्यात होणार असून प्रथम टप्यात भारतिय राज्यघटना या पुस्तकावर आधारीत बहुपर्यायी परीक्षा दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ रोज़ी घेण्यात येणार आहे. या परीक्षेतून सुमारे ३०० परीक्षार्थींची लेखी परीक्षा दिनांक ३० डिसेंबर २०१८ रोज़ी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी भारतीय राज्य घटने सह "शूद्र पूर्वी कोण होते "व "जाती व्यवस्थेचे निर्मुलन " या पुस्तकावर आधारीत असणार आहे. या परीक्षेत प्रथम येणा-या २५ जणांची निवड होऊन वरील तीन विषयांच्या चिठ्या टाकून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत यशस्वी होणा-या ३ यशस्वी विजेत्यांना " डॉ. बाबासाहेब आंबेडकर नायक २०१९ " हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. याशिवाय प्रथम बक्षिस रू. १ लाख, द्वितीय बक्षिस रू ५० हजार तर तृतीय बक्षिस रू. २५ हजार राहील. याव्यतिरिक्त ५ ऊत्तेजनार्थ बक्षिसे २२ खंड देण्यात येणार असून स्पर्धेच्या प्रत्येक टप्यावर सहभागी होणा-यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम दिनांक २७ जानेवारी २०१९ रोज़ी सायं.६.०० वा संत तुकाराम सभागृह सिडको औरंगाबाद येथे होईल. या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात येत अाहे. या उपक्रमाला राज्यभरातून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून डॉ. बाबासाहेबांचे साहित्य वाचून व लेखन करून ते वक्तृत्वाद्वारे व्यक्त करून स्पर्धेतून तावून सुलाखून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर नायक २०१९ " कोण बनणार याची ऊत्सुकता सर्वत्र लागली आहे.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समाजमाध्यमातील मिलिंद नागसेन ग्रूप मधिल सर्व सदस्य तन ,मन व धनाने प्रयत्न करीत आहेत. यासाठी तांत्रिक टीम सक्रीय असून ६ सदस्य टोल फ़्री क्रमांकावरून २४ तास माहीती देत आहेत. या शिवाय ऊत्कर्ष फौंडेशन , आंबेडकराईटस् ग्रूप या समाजमाध्यमातील सर्व क्षेत्रातील समाजातिल मान्यवर ईतरही अनेकजन या उपक्रमामागे आहेत. या ऊपक्रमाचा भाग म्हणून म्हणून मोफत ऑनलाईन नोंदणी सुरू असून www. ambedkarnayak.com या वेब साईट ला सुमारे १० हजार लोकांनी भेट दिली आहे.
तरी या द्वारे सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण www.ambedkarnayak .com या वेब साईट वर भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करावी व जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी घडवून आणावी व आंबेडकर नायक उपक्रम यशस्वी करावा .

0 टिप्पण्या