'शिक्षण बचाव मोर्चा' ला उपस्थित राहण्याचे आवाहन

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

'शिक्षण बचाव मोर्चा' ला उपस्थित राहण्याचे आवाहन


सोलापूर (प्रतिनिधी)- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'शिक्षण बचाव मोर्चा' दि २६ आक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून सम्यकचे प्रदेशाध्यक्ष महेशजी भारतीय यांच्यासह सम्यकचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सिद्धार्थ खरात, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदीप वानखडे, सोलापूर जिल्हा निरीक्षक अमोल सिरसाट आदी उपस्थित राहणार आहेत. 
         

           सम्यकचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार शिवशरण यांच्या नेतृत्वात निघणारा हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलन सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या