अकोला(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत आ की सोनोने यांच्या शेतकरी दादा व इतर कविता या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज (दि २०) राष्ट्रीय प्रवचनकार प्रा दि वा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.
स्थानिक सम्यक संबोधी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेन्नई येथील निवृत्त आय ए एस अधिकारी विश्वनाथ शेगावकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र देशमुख, प्रतापसिह बोदडे, नागसेनदादा सावदेकर, पी जे वानखडे, सुगत वाघमारे, प्रा मुकुंद भारसाखडे, भास्कर जाधव, डॉ भास्कर पाटील, डॉ एम आर इंगळे, सम्यकचे जिल्हाध्यक्ष अमोल सिरसाट आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला एन टी वानखडे, अशोक इंगळे, रमेश तायडे, डॉ अरुण चक्रणारायण, भाऊराव तेलगोटे, बी एस इंगळे, अरुण सिरसाट, आत्माराम पळसपगार, दगडू वाहूरवाघ, गजानन इंगळे, अमरदीप वानखडे, संजय डोंगरे, प्रजानंद उपर्वट, योगेश किर्तक आदींसह अकोला जिल्ह्यातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या