बाळासाहेबांना साथ द्या!

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेबांना साथ द्या!

येवला (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तमाम आंबेडकरी जनतेने जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा महा उपसिका मिराताई आंबेडकर यांनी येवला येथे बोलताना केले



धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुक्तिभूमी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मीराताई आंबेडकर बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डी. एम. उबाळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष यू. डी. बोराडे, ज्येष्ठ नेते रूपवते, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, आगवणे, अनिकराव गांगुर्डे, भिवानंद काळे आदी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकरांनी येवला शहरात धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा करून जगाला समतेचा संदेश दिला आहे. आपण बौद्ध आहोत ही जाणीव सर्वांनी ठेवून बौद्धधम्माचे पालन करावे, असे आवाहनही मीराताई आंबेडकर यांनी केले. यावेळी पवन पवार, यू.डी. बोराडे, डी. एम. उबाळे, आगवणे, वि. म. रूपवते, अनिकराव गांगुर्डे, एम. आर. गांगुर्डे, भाऊसाहेब जाधव, डॉ. संजय जाधव आदींची भाषणे झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या