शिक्षणातील विषमता नष्ट झाली पाहिजे - स्वाती भारतीय

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणातील विषमता नष्ट झाली पाहिजे - स्वाती भारतीय


अकोला(प्रतिनिधी)- शिक्षण सर्वांना समान मिळाले पाहिजे, शासकीय आणि खासगी शाळांमधील वाढत चाललेली दरी नष्ट झाली पाहिजे, शासकीय शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळालेच पाहिजे ही आग्रही मागणी आमची असून यासाठी सातत्याने आम्ही शासनाशी झगळु असे प्रतिपादन सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा निरीक्षक स्वाती भारतीय यांनी केले. 


त्या अकोला  तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथे (दि ७) ग्राम शाखेच्या उद्धघाटन समारंभाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी सम्यकचे विभागिय अध्यक्ष नितेश किर्तक, जिल्हाध्यक्ष अमोल सिरसाट, गावच्या सरपंचा उज्वलताई वानखडे, जिल्हा महासचिव भाग्यश्री इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष हितेश जामनिक, जिल्हा संघटक राजकुमार दामोदर, जिल्हा कोषाध्यक्ष योगेश किर्तक, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदिप वानखडे, तालुकाध्यक्ष धिरज पांडे, तालुका महासचिव, महानगर महासचिव पवन गवई, प्रसिद्धिप्रामुख रितेश किर्तक, प्रेमकुमार वानखडे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार हितेशभाऊ जामनिक यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या