सम्यकचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सम्यकचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

सोलापूर (प्रतिनिधी)- भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन सोलापूरच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात शिक्षण बचाव मोर्चा काल (दि.२६) रोजी काढण्यात आला.


या मोर्चाला प्रमुख उपस्थिती म्हणून सम्यकचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांच्यासह सम्यकचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदीप वानखडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा वाशीम जिल्हा निरीक्षक प्रवीण विरघट उपस्थित होते. तर या मोर्चाचे नेतृत्व सम्यकचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार शिवशरण यांनी केले होते.


हा मोर्चा चार पुतळा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला.

यावेळी निखिल होळकर, मिलींद तळभंडारे, सिद्धार्थ माने, रत्नकांत चंद्रकांत गावडे, सचिन वाघमारे रविराज पोटे, रवी थेटे आदींसह विद्यार्थीनिंची विशेष उपस्थिती होती.


यावेळी जिल्हा कामिटीच्या वतीने शासनाच्या धोरणाचा निषेध करणारे पथनाट्य सादर करून शेतकरी आत्महत्या, शिक्षण, बेरोजगारी, गरिबी यावर वास्तव चित्रण मांडले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या