औरंगाबाद (प्रतिनिधी) - बहुजन नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या फुले - आंबेडकर विद्वत सभेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा भारत सिरसाट यांची निवड करण्यात आली आहे. असे विद्वत सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राचार्य म ना कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रा. भारत सिरसाट हे अनेक वर्षांपासून ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान आणि निकटवर्णीय असून औरंगाबाद येथे सातत्याने आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय कार्य करीत आहेत. यासह ते रमाई प्रकाशनचे संचालकही आहेत.

1 टिप्पण्या