सोलापूर(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जवळ जवळ सर्वच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला शिक्षण घेणे अत्यंत कठिण होऊन बसले आहे. आर्थिक मंदी, कारखाने पटापट बंद पडत असल्यामुळे शहरी भागातील मध्यमवर्गीय, कामगार यांच्या मुलांचे शिक्षण बंद पडत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता "सम्यक विद्यार्थी आंदोलन" या विद्यार्थी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी "शिक्षण हक्क परिषदेचे" आयोजन दि.२३ नोव्हेंबर २०१८ रोजी, सकाळी १० वा. डाॅ.आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन रोड, दादर (पु) मुंबई येथे करण्यात आले आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्रातुन सुमारे १००० प्रतिनिधी उपस्थित राहनार असल्याची माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी दिली आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन मा.न्यायमुर्ती अभय ठिपसे(निवृत्त न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय) यांच्या हस्ते होणार आहे. तर अधिवेशनाच्या अध्यक्षपदी मा.न्यायधीश सुरेश(निवृत्त न्यायधीश, मुंबई उच्च न्यायालय) उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डाॅ.एस.एस. धाकतोडे, प्रा.हमराज उईके, प्रा. सुरेश शेळके ,प्रा.फहाद अहमद आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी या अधिवेशनाला महाराष्ट्रातून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सम्यक विद्यार्थी आंदोलन पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सिद्धार्थ खरात, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अमरदीप वानखडे, सोलापूर जिल्हा निरीक्षक अमोल सिरसाट, सोलापूर जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार शिवशरण आदींनी केले आहे.

0 टिप्पण्या