संविधान दिन साजरा न करणा-या अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई करा - सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संविधान दिन साजरा न करणा-या अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई करा - सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

बुलढाणा (प्रतिनिधी) - शासनाने प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्याचे आदेश दिले असतांना या आदेशाची पायमल्ली करून संविधान दिन साजरा न करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रविण विरघट यांनी केली आहे. 
या संदर्भात कुरखेड ता शेगाव जि बुलढाणा येथील ग्राम पंचायत कार्यालय व मराठी प्राथमिक शाळा येथे संविधान दिन साजरा न केल्याबद्दल मा जिल्हाधिकारी यांच्याकडे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने निवेदन देऊन आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा करणा-या कर्मचारी व अधिका-यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

या निवेदनावर सम्यकचे जिल्हाध्यक्ष प्रवीण विरघट, ऍड. अनिल इखारे (कायदे विषयी सल्लागार, सम्यक विद्यार्थी आंदोलन), रोशन इंगळे (शहर अध्यक्ष सम्यक शेगाव), दादाराव अंभोरे (जेष्ठ नेते भारिप), गौतम इंगळे (ता अध्यक्ष युवा आघाडी भारिप),
आशिष शेंगोकार (सम्यक जिल्हा सदस्य) संतोष साळवे (सम्यक जिल्हा सदस्य), राहुल शेंगोकर, संतोष तायडे, विनोद सावदेकर, सचिन सावदेकर (ता उपाध्यक्ष युवा आघाडी) आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष-या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या