वर्धा (प्रतिनिधी)- स्मृती. विश्वानाथराव चोपडे परिसरात पंचशील बहुउद्देशीय संस्था देलवाडी आणि निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर आयोजित ३ रे ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन दि. २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी देलवाडी, ता. आष्टी जि. वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाला विशेष उपस्थिती म्हणून आमदार अमर काळे, अनंतराव मोहोळ, जयश्रीराम यावले, ऍड झाने साहेब, प्रा आत्माराम ढोक, सिद्धार्थ मेश्राम आदी उपस्थित राहणार आहेत.
दुस-या सत्रामध्ये अमरावती येथील विलास थोरात याचे 'गुलामगिरी' हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
तीस-या सत्रात संविधान आणि आंबेडकरी साहित्य या विषयावर प्रा भास्कर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात धम्मा कांबळे, रमेश राठोळ, डॉ सुनंदा रामटेके, अशोक निमस्कार, प्रा दिवाकर सादांशीव, भाई अरविंद वानखडे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
चौथ्या सत्रात कथाकथन होणार असून यामध्ये प्रसिद्ध कथाकथनकार संजय डोंगरे सहभागी होणार आहेत.
पाचव्या सत्रात सुनीता इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन होणार आहे. या संमेलनात विदर्भातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या समारोपिय सत्रात प्रा भारत सिरसाट, प्रा राजेंद्र कांबळे, यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर रक्षक, प्रा रमेश राठोड, सुभाष इंगळे, आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मधुकर चोपडे, प्रविण कांबळे यांनी केले आहे.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंबेडकरी महिला चळवळीचे मुखपत्र मासिक रमाई, औरंगाबादच्या संपादक प्रा डॉ रेखा मेश्राम ह्या असणार आहेत तर उद्घाटक म्हणून आंबेडकरी विचारवंत डॉ वामन गवई उपस्थित राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून अजबराव चोपडे, दिवाकर चोपडे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला माजी संमेलन अध्यक्ष प्रा अशोक इंगळे, (अकोला) उपस्थित राहणार आहेत.

0 टिप्पण्या