अँड. गुणरत्न सदावर्ते यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनाशी संबंध नाही - महेश भारतीय

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अँड. गुणरत्न सदावर्ते यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनाशी संबंध नाही - महेश भारतीय


मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात आणि सोशल मिडियावर नुकतीच एक बातमी प्रकाशित झाली आहे की अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी महाराष्ट्र शासनाने जे मराठा समाजाला १६% आरक्षण जाहीर केले आहे, त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेशी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि भारिप बहुजन महासंघ यांचा काहीही संबंध नाही. असा खुलासा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.
पुढे बोलताना भारतीय म्हणाले की, प्रकाशित बातम्यांमध्ये बातम्यांमध्ये भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे ते (सदावते) सहकारी असल्याचे बिनबुडाचे वृत्त छापून आले आहे. त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलनाशी सदावार्ते संबंधित होते असेही त्या वृत्तात म्हटले आहे, हे संपूर्णत: खोटे आहे. गुणरत्न सदावर्ते हे कमर्शिल कमर्शिअल वकिल आहेत. ते सम्यक विद्यार्थी आंदोलनात कधीच नव्हते. सरकारने जाहीर केलेले आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे. या दृष्टीने सरकारने पूर्णतः काळजी घेतली पाहिजे असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर हे आरक्षण टिकण्यासाठी आरक्षणाची टक्केवारी ७0% पर्यंत घेऊन जावी आणि संसदेत तसा कायदा करावा अशी एक पाऊल पुढची भूमिका अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की, अँड. प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणा संदर्भात निघालेल्या
मोर्चाच्या विरोधात ‘प्रति मोर्चे काढू नका' अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. हा मराठा विरोधी मागासवर्गीय अशी भांडण लावण्याचा कुटील डाव काही मंडळी आखित आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनामध्ये अनेक पदाधिकारी मराठा समाजाचे आहेत. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून फूट पाडण्यासाठी अशा प्रकारचे खोडसाळ कृत्य आणि वृत्त प्रसारित करण्यात आले आहे, त्यासाठीच हा खुलासा करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
सम्यक विद्यार्थी आंदोलन जिंदाबाद