महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेच्या आंदोलनाला यश
बाळापुर (प्रतिनिधी) - पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांना २०१७ पासून दिवाळी बोनस मिळालेले नाही या संदर्भात महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सुरज सोनवणे यांचे नेतृत्वात मुख्य अभियंता यांना दिनांक 17 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर विचार करून मेकविल भारत लिमिटेड कंपनी तर्फे दिनांक 22 डिसेंबर रोजी एक बैठक घेण्यात आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर चर्चा करून येत्या 22 डिसेंबर पर्यंत कंत्राटी कामगारांना दिवाळीचा बोनस देण्यात येणार असल्याची लेखी माहिती वेल्फेअर ऑफिसर यांनी यावेळी दिली आहे.
गेल्या ३ महिन्यापासून कंत्राटी कामगारांना बोनस मिळावे यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर आज या आंदोलनाला यश मिळाले आहे . या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटना कामगारांच्या हितासाठी सातत्याने लढत असून संघटनेच्या वतीने आम्ही कामगारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी यावेळी असल्याचे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख अमरदीप वानखडे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या