(एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी चा लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर केला त्यासंदर्भात अकोला येथील राजकीय विश्लेषक सुरेश सिरसाट यांचा लेख)
लोकसभा 2019 च्या निवडणूकीला तीन साडेतीन महिन्याचा कालावधी शिल्लक उरला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या मित्र पक्षांसोबत वाटाघाटी करण्यात व्यक्त आहेत. मात्र भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख संयोजक अॅड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वच राजकीय पक्षांना मागे टाकत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातुन पक्षाचे आमदार बळीराम शिरस्कार यांची उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच आज धक्का दिला आहे.
युतीच्या मुद्द्यावरून इतर राज्यात कॉंग्रेस पक्षाने प्रादेशिक पक्षांची जशी फरफट केली तशी माझी मी होऊ देणार नाही हे लोकसभेची पहिली उमेदवारी जाहीर करून कॉंग्रेस पक्षाला जणू अॅड आंबेडकरांनी फटकारच लगावली आहे.
राज्यात वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून आम्ही कॉंग्रेस पक्षासोबत युती करण्यास तयार आहोत असे जुनमध्येच अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी कॉंग्रेसला 12 लोकसभेच्या जागांचा युतीचा प्रस्ताव पाठविला होता.मात्र दोन महिने कॉंग्रेसने सदर प्रस्तावाची दखलच घेतली नाही. कॉंग्रेसचा इतर राज्यातील युतीसंदर्भात अनुभव होता कॉंग्रेस पक्ष प्रादेशिक पक्षांना शेवटपर्यंत नुसते झुलवत ठेवतो.त्यामुळे त्यांनी एम आय एम पक्षाशी युती जाहीर केली.
अॅड आंबेडकरांनी एम आय एम शी युती जाहीर करता ना करता तोच केवळ आपणच राजकीय सारीपाट खेळण्यात माहिर आहोत अशा अविर्भावात असलेल्या कॉंग्रेसला खडबडून जाग आली. आणि राज्यातल्या कॉंग्रेस नेत्यांनी अॅड आंबेडकरांची भेट घेतली.तीन चार बैठक होऊनही कॉंग्रेस नेत्यांनी बाळासाहेबांच्या 12 जागांवरच्या प्रस्तावावर काय निर्णय घेतला हे कायम गुलदस्त्यातच ठेवले.
असे असताना इकडे कॉंग्रेसने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली.प्रकाश आंबेडकरांनी आधी एम आय एम सोबतची युती तोडावी तरच आम्ही आंबेडकरांशी युतीचे बोलु ! अशी नकारघंटा वाजवायला सुरुवात केली.असे जाहीर करून युतीबाबत कॉंग्रेसने जनतेत संभ्रम निर्माण करायला सुरुवात केली.
तर दुसरीकडे निवडणूका तोंडावर आल्या असताना सुध्दा युतीबाबत काहीच निर्णय होत नाही उलट कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आपसात जागा वाटप पुर्ण होते कसे ? आणि होऊ इच्छित असलेल्या मित्र पक्षांना ताटकळत कसे ठेवल्या जाऊ शकते ? असा प्रश्न निश्चितच निर्माण झाला.दरम्यान तर आम्ही अकोला लोकसभेची (च) जागा प्रकाश आंबेडकरांना सोडण्यास तयार आहोत असे प्रसारमाध्यमांतुन कॉंग्रेसने बातम्या पेरायला सुरुवात केली.
आपल्याला कदाचित माहीत असेलच की, कॉंग्रेसच्या युती धोरणाबाबत गुजरात व कर्नाटक विधानसभेच्या इलेक्शन दरम्यान व नंतरच्याही काळात जाहीर भाषणात व पत्रकार परिषदांमध्ये अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी टिका करून शंका उपस्थित केली होती.आपल्याला कॉंग्रेसकडून दगाफटका होऊ शकतो म्हणून अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी सुरूवाती पासुनच सावधगिरी बाळगली आहे हे त्यांच्या वेळोवेळी घेतलेल्या निर्णयावरून स्पष्ट दिसून येते.
राज्यात अठरापगड जाती समुहातील अलुतेदार बलुतेदार , मोठ्या ओबीसींमधले धनगर, माळी, मुस्लिम,कुणबी,लिंगायत तर भटक्या विमुक्त जमाती,आदिवासी, छोट्या ओबीसी समुहातील लहान लहान समुह,मातंग, बौद्ध आंबेडकरी व अन्य बऱ्याच वंचित समाज समुहांना एकत्र जोडण्यात बाळासाहेब आंबेडकरांना प्रचंड यश आले आहे. या वंचित समुहाच्या आजपर्यंत अॅड आंबेडकरांच्या उपस्थितीत साधारण किमान दोनशे हजारो ते लाखोंच्या जनसभा राज्यात घेण्यात आल्या आहेत. या सभांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वंचित समुहांमध्ये जनजागृती करण्यात करण्यात वंचित बहुजन आघाडी यशस्वी झाली आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जागा वाटप झाले आहे. होऊ इच्छिणाऱ्या मित्र पक्षांना आता जागाच शिल्लक नाहीत. कॉंग्रेस केवळ आपल्याशी युतीचा फार्स करीत आहे हे बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आल्यामुळे व आपली विनाकारण फरफट नको म्हणून त्यांनी निर्णायक व्यूहरचना करून मागील आठवड्यातच दि.6जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत जिल्हावर कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यकर्त्यांना लोकसभेच्या प्रचार कार्याला तयार रहा म्हणून आदेश दिले आहेत.
आज तर अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित माळी समाजातील आमदार श्री बळीराम शिरस्कार यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघातुन उमेदवारी जाहीर करून सर्व लोकसभेच्या जागा लढवून त्या जिंकण्याच्याच हेतूने निर्णायक आघाडी घेतली आहे असे म्हणावे लागेल. ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या या निर्णयाने मात्र सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे एवढे मात्र निश्चित.

0 टिप्पण्या