बीड (प्रतिनिधी)- संघटना बांधणीसाठी आणि विस्तारासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय असावे त्यातून संघनेची उत्तम बांधणी होते असे प्रतिपादन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांनी केले. ते आज ( दि. १२ जानेवारी) रोजी बीड येथे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्यातील पहिल्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन प्रदेश सचिव
प्रशांत भाऊ बोराडे, अनिलभैय्या डोंगरे, भारीप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटोळे, विष्णुबाळ झोडगे, लंबाटे बाळाजी, अजय साबळे, आकाश साबळे, दिपक डोंगरे, संघर्ष राऊत,देवा सोनवणे, आकाश साठे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना भारतीय म्हणाले की, राज्यातील सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पहिल्या कार्यालयाचे उदघाटन करतांना मनस्वी आनंद होत असून विद्यार्थ्यांनी स्वबळावर केलेल्या या वास्तूचा संघटनेबांधणीसाठी निश्चितच उपयोग होईल. आणि लवकरच महाराष्ट्रभर सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हा कार्यलय प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असल्याचे भारतीय यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
0 टिप्पण्या