मुंबई (प्रतिनिधी) - ३८०० मराठी शाळा बंद करण्याची योजना रद्द करा, केजी टू पीजी शिक्षण सर्वाना मोफत द्या, शिक्षणाचे व्यापारीकरण तात्काळ थांबवा, अल्पसंख्याक व मागासवर्गीय आर्थिक दुरबल घटक विध्यार्थ्यांना राष्ट्रीय फेलोशिपसाठी "नेट" ची अट रद्द करा आदी मागण्या घेऊन उद्या महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांवर "धडक मोर्चे" सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय यांच्या आदेशान्वे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा प्रकाश इंगळे, अक्षय गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातून हे मोर्चा यशस्वी करण्यासाठी त्या-त्या जिल्ह्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. तर या मोर्चासाठी भारिप बहुजन महासंघ, (महिला आघाडी, युवक आघाडी), वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आदिंनी त्या-त्या जिल्ह्यातील पदाधिका-यांना विशेष सहकार्य केले असून राज्यातील इतर विद्यार्थी संघटना, शिक्षक-प्राध्यापक संघटनांनीही या मोर्चाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने आणि शांततेने हा मोर्चा यशस्वी करा असे आवाहन महेश भारतीय यांनी केले असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे मीडिया सेल प्रमुख अमरदीप वानखडे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या