स्वाधार योजनेतील दिरंगाई थांबवा - सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वाधार योजनेतील दिरंगाई थांबवा - सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

औरंगाबाद (प्रतिनिधी)- अनुसूचित जातीतील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०१६ पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे. परंतु या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसून त्याचा परिणाम संशोधनावर होत आहे. सदरील बाब लक्षात घेता सम्यकने ६ महिन्यांअगोदर समाजकल्याण विभागाला निवेदन देऊन त्यातील दिरंगाई लक्षात आणून दिली होती. परंतु त्यावर कुठलीही कारवाही न केल्यामुळे आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने समाज कल्याण आयुक्त आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सदरील मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रकाश इंगळे यांनी दिला आहे.



यावर बोलताना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष पवन साळवे म्हणाले की, या  योजनेनुसार शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना २ वर्ष पूर्ण असणाच्या अभ्यासक्रमात ह्या योजनेचा लाभ मिळत असतो. विद्यापीठ अनुदान आयोगानुसार एम.फिल. हा कोर्स भारतातील अनेक विद्यापीठामध्ये चालविण्यात येतो. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत विविध विद्याशाखेमधील एम.फिल. हा कोर्स चालविण्यात येतो. सदर कोर्स हा २ वर्षाचा असून असे पत्र विद्यापीठातील अभ्यासक्रम विभागामार्फत समाजकल्याण आयुक्तांना देण्यात आलेले आहे. तरी सुद्धा एम.फिल. करणा-या विद्यार्थ्यांची २०१७ पासूनची शिष्यवृत्ती आणखी ही जमा झालेली नाही. यामुळे अनेक संशोधन करणाच्या विद्यार्थ्यांना आपल्या संशोधनापासून दूर जावे लागत आहे आणि त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेवून आज आम्ही याठिकाणी निदर्शने केली आहेत. 
यावेळी जयश्री शिर्के, एड नागसेन वानखडे, अमोल घुगे, अमरदीप वानखडे, प्रशांत बोराडे, अनिल दीपके, मयुरी जोगदंड, पल्लवी जमदाडे, सारिका दळवी, अक्रम खान, सिद्धार्थ मोरे, अण्णासाहेब सोनोवणे, राहुल खंदारे, नारायण खरात, भीमराव वाघमारे, राहुल कांबळे, भागवत चोपडे, सिद्धार्थ कांबळे, हितेश जोशी, सिद्धांत सोनोवणे, राहुल पंडित, अमोल शिंदे, रामेश्वर मुळे, विजय धनगर, विश्वद्विप घुगे आदींसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या