महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेचा एक दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेचा एक दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा

पारस (प्रतिनिधी)- अनेकवेळा निवेदन, विनंती करूनही कामगारांच्या प्रश्नावर मुख्य अभियंता सकारात्मक भूमिका घेत नसल्यामुळे औष्णिक विद्युत  केंद्राच्या पारस मुख्य इमारतीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघाचे अध्यक्ष सूरज सोनवणे यांनी दिला आहे.

आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सोनवणे म्हणाले की, ई एस आय सी अंतर्गत राज्य कर्मचारी विमा नियम या सदराखाली सर्व कंत्राटी कामगारांची आरोग्य हितसंबंधीच्या सुविधा  व त्यांच्या परिवाराला मिळणारे  लाभ पारस सोडून इतरत्र सर्व वीज केंद्रामध्ये मिळाला तरी हा लाभ पारस मधील सर्व  कंत्राटी कामगारांना पारस माडे  मिळून देण्यात यावा, शासकीय नियमानुसार कुशल अर्धी कुशल आणि कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे आणि कंत्राटी कामगारांना पेंमेंट स्लिप  देण्यात यावी आदी मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटनेच्या वतीने अनेक वेळा मुख्य अभियंता विनंती अर्ज देण्यात आली तरी त्यांनी त्या काढे दुर्लक्ष केले  विद्युत केंद्रा यांच्याकडे निवेदन देऊनही त्यावर कोणत्याच प्रकारची अंमलबजावणी न केल्यामुळे आम्ही लवकरच एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या